ठाकरे सरकारच्या दुष्टीने पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा.. ? 

हिंदमाता, सायन, अंधेरी, दादर, वांद्रे परिसरात अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी शिरले आहे. याकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याची टिका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे.
2RAIN_PUNE.jpg
2RAIN_PUNE.jpg

मुंबई : गेल्या दोन दिवसापासून मुंबईमध्ये पावसामुळे ऩागरिकांची तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हिंदमाता, सायन, अंधेरी, दादर, वांद्रे परिसरात अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी शिरले आहे. याकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याची टिका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. शेलार यांनी याबाबत टि्वट करत ठाकरे सरकारचा समाचार घेतला आहे. 

आशिष शेलार आपल्या टि्वटमध्य म्हणतात की विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागात पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले. या हाहाकाराकडे, उध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत. त्यामुळे मुंबईकर हो ! सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा ?? शांतता राखा! बदल्या, टेंडर वाटप सुरु आहे!

  
दोन-तीन दिवसापासून मुंबईच्या उपनगरात सुरू असलेल्या पावसामुळं नागरिकांची ताराबंळ उडाली आहे. अनेक चाळी, बैठ्या घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरल्यामुळे नागरिक पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परळ, सायन, वांद्रे या भागात पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून पूर्व उपनगरात पावसाचा जोर थोडा कमी आहे.

कालपासून मुंबई व परिसरात सुरु असलेल्या तुफानी पावसामुळे संपूर्ण मुंबई जलमय झाली आहे. प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला असून सर्व शासकीय व खासगी कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत १७३ मिलीमीटर पावासची नोंद झाल्याचे मुंबई महापालिकेने सांगितले आहे. या संपूर्ण परिस्थितीवर मात करण्यासाठी एनडीआरएफच्या पाच तुकड्या तयार करण्यात आल्याची माहिती माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. 

कालपासून सुरु झालेला पाऊस थांबलेला नाही. त्यामुळे रेल्वेलाईनसह सर्वत्र पाणी साचले आहे. भेंडी बाजार, नाना चौक, मुंबई सेंट्रल, जेजे जंक्शन, हिंदमाता, काळा चौकी, वरळी सी फेस, माटुंगा अशा विविध ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. गेल्या चोवीस तासांत कुलाब्यात १३८ मिलिमीटर, पूर्व उपनगरात २० तासांत १९६ मिलिमीटर तर पश्चिम उपनगरांत २० तासांत १४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे सुटी जाहीर करण्यात आली असून आवश्यक त्या कामासाठीच घराबाहेर यावे, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्तांनी केले आहे. 

रुळांवर साचलेल्या पाण्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. काही गाड्या अगोदरच थांबवण्यात आल्या आहेत. मुंबई - भुवनेश्वर गाडी रात्री दहा वाजता सोडण्यात येणार आहे. भुवनेश्वर-मुंबई गाडी ठाण्यात थांबविण्यात आली तर हावडा -मुंबई गाडीही ठाण्याला थांबविण्यात आली. हैदराबाद - मुंबई आणि गदग- मुंबई या गाड्या कल्याणला थांबविण्यात आल्या.

अजूनही तुफान पाऊस सुरु आहे. प्रशासनाने सर्व खासगी व सरकारी कार्यालयांना सुटी जाहीर केली आहे. काल पासून मुंबई, ठाणे, पालघर यासह राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघर परिसरात पाणी तुडुंब भरत असल्याने नागरिकांनी सतर्क राहून आपल्या घरात राहावे, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. या संपूर्ण परिस्थितीवर मात करण्यासाठी एनडीआरएफच्या पाच तुकड्या तयार करण्यात आल्या असून आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेऊन आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com