ठाकरे सरकारने हे घेतले 7  महत्त्वपूर्ण निर्णय   - Thackeray government 7 important decisions | Politics Marathi News - Sarkarnama

ठाकरे सरकारने हे घेतले 7  महत्त्वपूर्ण निर्णय  

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

शिवभोजन थाळीचा दर 1 ऑक्टोबर 2020 पासून पुढील 6 महिन्यांसाठी  5 रुपये करण्यास मान्यता

मुंबई  : आज झालेल्या  कॅबिनेट  मंत्रिमंडळ बैठकीमध्ये  राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये शिवभोजन थाळीचा दर 1 ऑक्टोबर 2020 पासून पुढील 6 महिन्यांसाठी  5 रुपये करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 तर मुदत संपलेल्या व कोरोना विषाणु संक्रमणामुळे निवडणूका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त प्रशासकांचा कालावधी वाढविणार असल्याचा अध्यादेश  काढण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील विद्युत शाखेचे बळकटीकरण करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील रायगड जिल्ह्यात प्रस्तावित बल्क ड्रग पार्क व औरंगाबाद ऑरिक सिटी येथे वैद्यकीय उपकरण पार्क प्रकल्पाकरिता विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता दिली आहे ,तर राज्यातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या घरपट्टी व मालमत्ता कर माफ करण्यासाठी  बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना राबवणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे . 

 

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.#मंत्रिमंडळनिर्णय pic.twitter.com/J53Y1RYg36

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 29, 2020

तर ,धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली असून  नव्याने निविदा  मागविण्यात येणार आहेत ,असे मंत्रिमंडळातील बैठकीमध्ये   सांगण्यात आले.

मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकार इमारतींच्या जलद पुनर्विकासकरिता नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. आज झालेल्या बैठकीमध्ये  हे सर्वे निर्णय घेण्यात आले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख