मुंबई पोलिस आयुक्तालयातूनच दहशतवादी कारवाया... - terrorist activities from mumbai police headquarters | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

मुंबई पोलिस आयुक्तालयातूनच दहशतवादी कारवाया...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 17 मार्च 2021

अतुल भातखळकर यांचा घणाघाती आरोप 

मुंबई: मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांची बदली करून चालणार नसून त्यांचे निलंबन केले तरच मनसुख हिरेन यांना न्याय मिळेल. सचिन वाझे यांना वाचविण्याच्या नादात ठाकरे सरकार पूर्णपणे उघड्यावर पडले आहे. मुंबई पोलिस आयुक्तालयातूनच खंडणी आणि दहशतवादी कारवाया होतात, धमक्या दिल्या जातात, असा घणाघाती आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला. 

वाझे प्रकरणानंतर व खास करून परमवीर सिंह यांच्या झालेल्या बदलीमुळे भाजप चांगलाच आक्रमक झाला असून बड्या नेत्यांकडून ठाकरे सरकारचा समाचार घेतला जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, परमवीर सिंह यांची बदली करून उद्धव ठाकरे सरकारला वाटत असेल की प्रकरण दबेल, तर हा त्यांचा गैरसमज आहे. एका आयपीएस अधिका-याचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग असणे शोकांतिकाच म्हणावी लागेल. हे प्रकरण साधे नसून वाझे गँगला तुरुंगात पाठविल्याशिवाय गप्प बसणार नाही. 

भाजप आमदार राम कदम म्हणाले, २० दिवसानंतर जनआक्रोश वाढला तेव्हा राज्य सरकारने मुंबई पोलिस आयुक्तांची बदली केली. पूर्ण व्यवस्थाच वाझेंचे प्रवक्ते असल्याचे आता स्पष्ट होत आहे. राज्य सरकारमधील काही बड्या नेत्यांचे साटेलोटे असून वाझे कुणाकुणाकडे पैसे मागत होते, ते बाहेर येईलच. राज्य सरकारला परमवीर सिंह यांच्यावर खापर टाकून मोकळे होता येणार नाही.       

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख