take strong action against careless hospitals sheetal desai demands | Sarkarnama

रुग्णालयांवर तत्काळ कारवाई करणारी यंत्रणा उभारा : शीतल देसाई

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

माहीमच्या एका रुग्णालयात योग्य उपचार न झाल्याने प्रशांत काळे यांचा आठवड्याभरापूर्वी मृत्यू झाला होता. याबाबत श्रीमती देसाई यांनी पोलिसांकडेही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मुंबई : रुग्णांवर उपचार करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या व त्यांची लूट करणाऱ्या रुग्णालयांवर तत्काळ कठोर कारवाई करणारी यंत्रणा उभारावी, अशी मागणी माहीमच्या नगरसेविका शीतल गंभीर देसाई यांनी केली आहे. 

संदर्भातील सध्याची यंत्रणा वेळ खाणारी असल्याने रुग्णांना तत्काळ न्याय मिळत नाही व दोषींना धाक बसत नाही, असेही त्यांनी दाखवून दिले आहे. 

माहीमच्या एका रुग्णालयात योग्य उपचार न झाल्याने प्रशांत काळे यांचा आठवड्याभरापूर्वी मृत्यू झाला होता. याबाबत श्रीमती देसाई यांनी पोलिसांकडेही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या रुग्णालयाने यापूर्वीदेखील काही रुग्णांकडून जास्त पैसे उकळले होते, त्यावरून महापालिकेने त्यांना कारणे दाखवा नोटिसही दिली आहे. यासंदर्भातच श्रीमती देसाई यांनी वरील मागणी केली आहे. 

काळे यांना मोठ्या रुग्णालयात का पाठविण्यात आले नाही, याचीही महापालिकेतर्फे चौकशी केली जाणार आहे. याप्रकरणी हे रुग्णालय महिनाभर बंद ठेवण्याचा आदेश महापालिकेच्या सहायक आयुक्तांनी दिला आहे. तेथे असलेले रुग्ण इतर रुग्णालयात पाठवावेत व नवे रुग्ण दाखल करून घेऊ नयेत, असेही त्यांना बजावण्यात आले आहे. अशा सर्वच बेजबाबदार रुग्णालयांवर कारवाई करावी, अशी मागणी श्रीमती देसाई यांनी केली आहे. 

रुग्णालयाने रुग्णांवर हलगर्जीपणे चुकीचे उपचार केल्यास रुग्णांना कारवाईचे मार्ग आहेत, मात्र ते फार वेळ घेणारे आहेत. रुग्णांकडून जादा पैसे आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईसाठी सरकारने यंत्रणा केली आहे. मात्र ती यंत्रणा देखील रुग्णांना तत्काळ दिलासा देऊ शकत नाही. जे रुग्ण अव्वाच्या सव्वा पैसे देऊ शकत नाहीत, त्यांना अनेक रुग्णालये आपल्याच ताब्यात डांबून ठेवतात, घरी सोडतच नाहीत. तेथेही तातडीने हस्तक्षेप करून या रुग्णांना कैदेतून सोडवून घरी पाठवणेही सरकारी यंत्रणेला जमत नाही. या दोनही गुन्ह्यांमध्ये रुग्णालयांना नोटिसा देणे, त्यांचे म्हणणे ऐकणे असे प्रकार असल्याने वेळ जातो. त्यामुळे अशा नाडलेल्या रुग्णांना त्वरेने न्याय मिळावा अशी यंत्रणा सरकारने उभारावी, अशीही मागणी श्रीमती देसाई यांनी केली आहे.

सतेज पाटलांचा सल्ला

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे आंदोलन म्हणजे केवळ 'स्टंट' आहे. राज्यातील दूध उत्पादकांसाठी केंद्र सरकारने काय केले हे आधी भाजपच्या नेत्यांनी सांगावे. हिंमत असेल तर भाजप नेत्यांशी संबंधीत असणाऱ्या संघात आधी दोन रुपये अधिक दर देऊन दाखवा, असे आव्हान सतेज पाटील यांनी दिले.   

Edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख