त्या पोलिसास आणि अधिकाऱ्यास निलंबित करा अन्यथा मनसे स्टाईल चोप देऊ 

सामाजिक संघटनांनी मंगळवारी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
 Rupali Patil png
Rupali Patil png

मुंबई : जळगाव येथील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलिस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात मनसेने संबंधित पोलिस आणि अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली. 

या संदर्भात मनसेच्या नेत्या रुपाली पाटील फेसबुक पोस्टमध्ये म्हणाल्या की, जळगाव महिला वसतिगृहामध्ये पोलिसांसमोर महिलेला कपडे काढून नाचवत आहे. या प्रकरणाला संबंधित विभाग जबाबदार आहे. त्यामुळे पोलिसाला आणि अधिकाऱ्याला त्वरित निलंबित करा, अशी मागणी रुपाली पाटील यांनी केली आहे. अन्यथा आता आम्हाला त्या पोलिसाला आणि संबंधित अधिकाऱ्याला कपडे काढून मनसे चोप द्यावा लागेल, अशा इशारा देखील पाटील यांनी दिला.  

दरम्यान, सामाजिक संघटनांनी मंगळवारी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यात संबंधित कृत्याचा व्हिडीअोही सादर केला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले. 

महिला व बालकल्याण विभागामार्फत गणेश काॅलनीतील वसतिगृहात निराधार व अन्याय, अत्याचार झालेल्या महिला व मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी होत्या. 

काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वसतिगृहातील महिला व मुलींना भेटून माहिती जाणून घेतली असता १ मार्च रोजी काही पोलिस कर्मचारी व बाहेरील पुरुष यांनी मुलींना कपडे काढून जबरदस्तीने नृत्य करायला भाग पाडले. 

काही कर्मचार्यांच्या संगनमताने बाहेरील लोकांना व पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली आतमध्ये प्रवेश देऊन अनैतिक कृत्य केले जात असल्याचे काही मुलींनी सांगितले. ज्या मुली चुकीच्या कृत्यांना नकार देतात, त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली जाते. सामाजिक कार्यकर्त्यांनी आतमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता, मुली बाहेरुनच खिडकितून आपल्यावर बेतलेले प्रसंग सांगत होत्या. 

जळगावमधील आशादीप वसतीगृहात घडलेला प्रकार दुर्देवी आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी चार उच्चस्थरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहीती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. चौकशी झाल्यानंतर दोन दिवसांत तात्काळ कारवाई करणार असल्याचे आश्वासन अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिले आहे. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com