सुशांत आधीपासूनच ड्रग्ज घेत होता : श्रद्धा कपूर - Sushant Singh was already taking drugs: Shraddha Kapoor | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांत आधीपासूनच ड्रग्ज घेत होता : श्रद्धा कपूर

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्‍न पुढे येत आहेत.

मुंबई : आपण पार्टीत कोणतेही ड्रग्ज घेतले नाही, मी छिचोरे पार्टीत डग्जन घेतलेच नव्हते. अभिनेता सुशांतसिंह राजपूत हा आधीपासूनच ड्रग्ज घेत होता अशी माहिती अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी एनसीबीला चौकशीत सांगितल्याचे समजते 

ड्रज प्रकारणातल्या चौकशीसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण सकाळी साडेदहा वाजता तर अभिनेत्री सारा आणि श्रद्धा कपूर या साडेबारा वाजण्याच्या सुमारास एनसीबीच्या कार्यालयात हजर होत्या. दिपिकाची जवळजवळ पाच तास चौकशी झाली असून ती आपण कधीही ड्रग्ज सेवन कधीही केले नव्हते.मात्र त्या व्हाट्‌स अप चॅट मीच केले होते अशी माहिती तिने दिल्याचे समजते.

एकीकडे तिची पाच चौकशी झाली असताना दुसरीकडे श्रद्धा कपुरचीही चौकशी सुरू आहे. तिने तर मी कधीही ड्रग्जचे सेवन केले उलट सुशांतच ड्रग्ज आधीपासून घेत होता, मात्र कोणाच्या सांगण्यावरून तो ड्रग्ज घ्यायचा हे आपणास माहित नाही अशी माहिती तिने दिल्याचे समजते. 

अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्‍न पुढे येत आहेत. बॉलिवूडमधील घराणेशाहीने त्याचा बळी गेल्याचा खळबळजनक आरोप अभिनेत्री कंगना रानावत हिने केला आहे. तसेच बॉलीवूडला गटार म्हणण्याबरोबरच मुंबई पीओक म्हणण्यापर्यंत कंगनाची मजल गेली होती. टीका करताना तिला आपण काय बोलतो आहोत याचे भानही राहिले नाही. 

मुंबईला पीओक म्हटल्यानंतर शिवसेनेने तिच्यावर सडकून टीका केली होती. शिवसेना विरूद्ध कंगना असा सामनाही रंगल्याचे दिसून आले. तसेच सुशांत ड्रग्जच्या आहारी गेल्याचेही पुढे आले. बॉलीवूडमध्ये डग्ज घेणारे अनेक कलाकार आहेत आणि त्यांच्या ड्रग्जशिवाय पार्टी होत नाहीत असे आरोप आणि व्हिडिओही पुढे आले आहेत. त्यामुळे एनसीबी काही अभिनेत्रींची चौकशी करीत आहेत. आजा दिपिका,सारा अली खान आणि श्रद्धा कपूरही आज चौकशीला सामोरे गेले आहेत. 

या तीनही अभिनेत्री एनसीबी कार्यालयात पोचत असल्याने माध्यमांच्या प्रतिनिधीनी एनसीबी कार्यालयाजवळ गर्दी केली होती. 

दिपिका पदुकोण ड्रग्जप्रकरणी अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. एनसीबी कार्यालयाजवळ मोठा पोलीस पहारा या ठिकाणी लावण्यात आला होता. दिपिकाची पाच चौकशी आज झाली असली पुन्हाही तिला चौकशीसाठी बोलविण्यात येऊ शकते अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख