Supriya Sule .jpg
Supriya Sule .jpg

सुप्रिया सुळेंनी सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम पुढे ढकलले 

राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

मुंबई : राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी जमून कोरोना प्रादुर्भाव आणखी वाढू नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार व नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्यांचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आपण सर्वजनच योग्य ती खबरदारी घेत आहोत. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या सुचनेनुसार आपण आपले मतदारसंघ आणि इतर ठिकाणचे सर्व पुर्वनियोजित कार्यक्रम पुढील दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलले आहेत, असे सुळे यांनी कळविले आहे. 

मतदारसंघाशी संबंधित सर्व आढावा बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेण्यात येतील. व्यक्तीशः भेटीसाठी आपण मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात उपलब्ध असू, असे त्यांनी सांगितले आहे. बारामती लोकसभा मतदार संघाबरोबरच राज्यातील प्रत्येक नागरिकाने योग्य ती काळजी घ्यावी. सोशल डिस्टनसिंग राखण्याबरोबरच पुरेशी स्वछता राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केले आहे. 

दरम्यान, नागरिकांनी शिस्तीचे पालन करायला हवे, येत्या 2 एप्रिल पर्यंत जर रुग्ण संख्या कमी झाली नाही तर नाईलाजाने काही कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. २८ मार्च) बारामतीत अधिका-यांच्या बैठकीत बोलताना दिला आहे.

बारामतीतील कोरोनाच्या स्थितीबाबत पवार यांनी वरिष्ठ अधिका-यांकडून सविस्तर माहिती घेतली. शासनाने जे निर्बंध घालून दिलेले आहेत, त्यांचे पालन प्रशासन स्तरावर कडकपणे करण्यासंदर्भात त्यांनी आज अधिका-यांना सूचना दिल्या. 

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलतानाही पवार यांनी मास्कचा वापर अजूनही लोक करताना दिसत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन आपल्या स्तरावर वेगाने काम करते आहे, मात्र नागरिकांनी काळजी घेण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com