Supriya Sule .jpg
Supriya Sule .jpg

सुप्रिया सुळे यांनी राज्य व केंद्र सरकारला केली ही विनंती 

अनेक मुलांच्या डोक्यावरचे माता-पित्यांचे छत्र नष्ट झाले आहे. घरातील कमावत्या पालकांचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे अनेक मुलांच्या भविष्याचा प्रश्न देखील प्रकर्षाने पुढे आला आहे.

मुंबई : कोरोनामुळे (Covid-19) अनाथ झालेले एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये यासाठी दोन्ही सरकारच्या यंत्रणांनी परस्पर सामंजस्य व गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता आहे. याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. (Supriya Sule made this request to the State and Central Government)

या संदर्भात सुळे यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या की ''कोरोनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक मुलांच्या डोक्यावरचे माता-पित्यांचे छत्र नष्ट झाले आहे. घरातील कमावत्या पालकांचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे अनेक मुलांच्या भविष्याचा प्रश्न देखील प्रकर्षाने पुढे आला आहे. त्यांचे शिक्षण, आरोग्य इत्यादीची काळजी घेणे आवश्यक आहे. 

यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची आवश्यकता असून केंद्रसरकारने व राज्यसरकारने परस्पर सामंजस्याने व गांभीर्याने काम करण्याची आवश्यकता असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. मुले देशाचे भविष्य असतात. त्यामुळे त्यांच्या भविष्याला आकार देण्याचे काम आपल्याला करावेच लागणार आहे. ती आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारीदेखील आहे याची आठवणही खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला करुन दिली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेसी संवाद साधतांना म्हणाले होते की ''दुसऱ्या लाटेने मोठा तडाखा दिला आहे. अनेकांचे आप्तस्वकीय गमावले आहेत. अनेक बालके अनाथ झाली आहेत. केंद्र सरकारने त्यासाठी योजना जाहीर केली आहे. पण राज्य सरकारही अशा बालकांची जबाबदारी घेईल. या अनाथ बालकांना पावलोपावली मदत करेल. त्यासाठीची योजना लवकरच जाहीर करू, असे आश्वासन त्यांनी दिले होते. 

कोरोना संकट कमी होत असले तरी तातडीने रस्त्यावर येऊ नका. लाॅकडाऊन उघडा यासाठी अनेक जण आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत. मात्र तसे करू नका. रस्त्यावर यायचे असेल तर कोरोनादूत म्हणून उतरू नका तर कोरोनायोद्धे म्हणून उतरा. तिसऱ्या लाटेचे निमंत्रक म्हणून रस्त्यावर उतरू नका. निर्बंध लादणे हे कटू काम आहे. मला ते करावे लागते आहे. अजूनही आरोग्य व्यवस्थेत काम सुरू आहे. आपल्याला हळूवापरपणे एकेक गोष्टी उघडाव्या लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com