शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक; गुन्हा दाखल
Shilpa Shetty,Sunanda Shetty .jpg

शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक; गुन्हा दाखल

या प्रकरणी शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांनी जुहू पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचा जामीनही न्यायालयाने फेटाळला आहे. त्यातच आता अभिनेञी शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पॅार्न फिल्मची निर्मीती प्रकरणात राज कुंद्रा यांच्या अटकेमुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. (Sunanda Shetty cheated in land transaction case) 

या प्रकरणी शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांनी जुहू पोलिसात तक्रार नोंदवली आहे. सुधाकर घारे यांच्या विरोधात ही तक्रार नोंदवण्यात आली असून ते मूळचे रायग जिल्ह्यातील कर्जतचे शेतकरी आहेत. सुनंदा यांनी मे 2019 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान सुधाकर यांच्याकडून कर्जत येथील जमिनीचा व्यवहार केला होता. यावेळी जमीन ही स्वत:च्या नावावर असल्याचे सांगून सुधाकरने जमिन व बंगल्याची खोटी कागदपञे बनवून सुनंदा यांना 1 कोटी 60 लाखांना विकला. फसवणूक झाल्याचे सुनंदा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सुधाकरकडे पैशांसाठी तगादा लावला. सुधाकर हा एका राजकिय नेत्याचा जवळचा हस्तक असल्याचे सांगितले जाते.

पैसे परत करणार नाही. कोर्टात जा अशी धमकी सुधाकर देत असल्याचे सुनंदा यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी सुनंदा यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयानने दिलेल्या आदेशानुसार जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी जुहू पोलिस अधिक तपास करत आहे.

दरम्यान, पॉर्न फिल्म प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने पोलिसांनी पावले टाकली आहेत. पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणा-या रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने राज कुंद्रा याला अटक केली. त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात तो मुख्य सूत्रधार आहे.

या प्रकरणी राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टी हिचा सहभाग होता का याचाही तपास पोलीस करीत आहेत. पोलिसांनी तिचा जबाब यापूर्वीच नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टी यांना अद्याप क्लिन चिट दिलेली नाही. सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. फॉरेन्सिक ऑडिटर्सची नियुक्ती करण्यात आली असून ते या प्रकरणाशी संबंधित सर्व बँक खात्यांमध्ये झालेल्या व्यवहारांची तपासणी करत आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in