उद्धव काका, आमचं शिक्षण कधी सुरु होणार? - Students parent  agitation near CM house mns | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

उद्धव काका, आमचं शिक्षण कधी सुरु होणार?

वैदेही काणेकर
सोमवार, 28 जून 2021

उद्धव ठाकरे यांच्या घराजवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलन केलं.

मुंबई : शुल्क न भरल्यामुळे मुंबईतील वांद्रे पूर्व येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील ४०० मुलांचे आँनलाइन शिक्षण बंद करण्यात आले आहे. या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराजवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलन केलं.  Students parent  agitation near CM house mns

उद्धव ठाकरे यांच्यावर निवासस्थानाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतील तब्बल 400 मुलांचं ऑनलाइन शिक्षण बंद करण्यात आले आहे. शुल्क न भरल्यामुळे या मुलांना शिक्षण घेता येत नाही . त्यासाठी शाळेसोबत अनेक बैठका झाल्या होत्या. मात्र त्यातून तोडगा न निघाल्यामुळे अखेर विद्यार्थी आणि पालक शाळेच्या बाहेर जमून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.  ''उद्धव काका, आमचं शिक्षण कधी सुरु होणार,''असे फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते.

''वांद्रे पूर्व येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या बाहेर आज विद्यार्थी आणि पालकांनी प्रतीकात्मक भीक मांगो आंदोलन केलं. शाळेशी अनेकदा चर्चा झाली असून कुठलाही तोडगा काढण्यास शाळा तयार नाही. यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल," असा इशारा मनसेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी दिला आहे.  

भाजप नेते गणेश नाईकांचे समर्थक संदीप म्हात्रे यांच्यावर कोयत्याने हल्ला
नवी मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचे समर्थक संदीप म्हात्रे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना नुकतीच घेतली आहे. नवी मुंबईत संदीप म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज सकाळी ही घटना घडली. या हल्ल्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. 
 Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख