एमपीएससी परीक्षांतून होणारा भाजप व संघधार्जिणा प्रचार रोखा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन ठाकूर यांनी निवेदन दिले.
Yashomati Thakur .jpg
Yashomati Thakur .jpg

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या माध्यमातून होणारा भारतीय जनता पक्ष व संघधार्जिणा प्रचार रोखावा. अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन ठाकूर यांनी निवेदन दिले. 'एमपीएससी परीक्षेचे संघीकरण करण्यात येत असून परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून भाजप धार्जिणा राजकीय प्रचार तसेच, काँग्रेस विरोधी भूमिका रुजवण्याचा प्रयत्न केला जात, असल्याचे निदर्शनास येत आहे'.

'मागील आठवड्यात घेण्यात आलेल्या एमपीएससीच्या परीक्षेत भारत सरकार किंवा केंद्र सरकार असा उल्लेख टाळून मोदी सरकार असा उल्लेख असलेला उतारा प्रश्नपत्रिकेत सामील करण्यात आला होता. तसेच काँग्रेसने ब्रिटिश शिक्षण पद्धती निवडली, असा तथ्यहीन आरोप असलेला उतारा जाणीवपूर्वक समाविष्ट करण्यात आला होता. यातून काँग्रेसची बदनामी करण्याचा हेतू स्पष्ट होत', असल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे.   

गेल्यावर्षी मनुस्मृतीसंदर्भात प्रश्न

दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षा देत असतात. गेल्यावर्षी परीक्षेत मनुस्मृतीसंदर्भात वादग्रस्त प्रश्न सामील करण्यात आला होता. जाणीवपूर्वक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी संबंधित अभ्यासक्रम रुजवण्यात येत असल्याची टीका ठाकूर यांनी केली आहे.

या राजकीयीकरणाला अभ्यासक्रमापासून दूर ठेवण्याची गरज आहे, तसेच अशा प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ठाकूर यांनी केली.  

Edited By - Amol Jaybhaye
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com