राज्यपाल कोशियारी आणि आघाडी सरकारचे आता `मिले सूर मेरा तुम्हारा...`

हे सौहार्द किती काळ टिकणार?
koshiyari-thackray
koshiyari-thackray

मुंबई : महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्यातील वाद नवीन नाहीत. राज्यपालनियुक्त आमदार असोत की परीक्षा घेण्याचा विषय असो दोघेही आमनेसामने येतात. या वादातून उत्तराखंड येथे जाण्यासाठी राज्य सरकारचे विशेष विमान राज्यपालांना नाकारण्याचा प्रकार घडला होता. एवढेच नाही तर राज्यपालांना विमानातून उतरावे लागले होते. या कटू आठवणी दूर सारून राज्यपालांना पुन्हा राज्य सरकारचे विमान देण्यात आले असून त्या विमानाने कोशियारी हे गोव्याला रवाना झाले आणि परत आलेसुद्धा

कोशियारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालापदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे त्यांना पणजी येथेही जावे लागते. त्यानुसार ते 14  एप्रिल रोजी गोव्याला सरकारी विमानाने रवाना झाले आणि 18 एप्रिलला परत आले. राज्यपाल कार्यालयाने आधी मुख्यमंत्री कार्यालयाची विमान प्रवासासाठी परवानगी घेण्याची अट न पाळली गेल्याने राज्यपालांना विमान नाकारण्याचा प्रकार घडल्याचा मुद्दा सरकारकडून सांगण्यात आला होता. तर परवानगी घेऊनही विमान नाकारल्याचे राज्यपाला कार्यलायाचे आधीच्या वादात म्हणणे होते. आता दोन्ही कार्यालयांनी समन्वयाने कामकाज करत कोशियारींचा प्रवास सुकर केला. कोशियारी आणि सरकार यांच्यातील सौहार्दाचे संबंध आणखी किती काळ राहणार, याची उत्सुकता आहे. 

महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या बारा नावांची नियुक्ती राज्यपालांनी अद्याप केलेली नाही. हा मुद्दा कोणत्याही क्षणी उफाळून येऊ शकतो. नुकत्याच झालेल्या मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत राज्यपालांच्या या भूमिकेचा महाविकास आघाडी सरकारने प्रचारात वापर केला होता. 

ही पण बातमी वाचा : दिल्लीत कोरोना कहर, लाॅकडाऊन लागू

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे.  देशात काल (ता.18) 2 लाख 73 हजार कोरोना रुग्ण सापडले असून, 1 हजार 619 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिल्लीतही कोरोना संसर्गाची भीषणता वाढत चालली असून, रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालये अपुरी पडू लागली आहेत. यामुळे दिल्लीत आज मध्यरात्रीपासून पुढील सात दिवस संपूर्ण लॉकडाउन केला जाणार आहे. हा लॉकडाउन पुढील सोमवारपर्यंत (ता.26) असणार आहे. दिल्लीत शनिवारी 24 हजार 375 रुग्ण सापडले असून, 167 मृत्यू झाले आहेत. यामुळे दिल्लीत नवीन कोरोना रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णालये मिळत नसल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com