एसटी कर्मचाऱ्यांना एक तासात एक पगार देणार, अनिल परबांची माहिती  - ST employees will be paid one salary per hour, Anil Parbhan said | Politics Marathi News - Sarkarnama

एसटी कर्मचाऱ्यांना एक तासात एक पगार देणार, अनिल परबांची माहिती 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी आली तरी हातात पैसे नाहीत.

मुंबई : आत्महत्यासारखं कठोर पाऊल उचलू नका. तात्पुरत्या संकटातून आपण नक्की मार्ग काढू.दुःखी होऊन अश्‍या कोणत्याही टोकाचं पाऊल घेऊ नये असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे. 

गेल्या काही दिवसापासून थकित वेतनासाठी एसटीचे कर्मचारी आंदोलन करीत आहे. नोकरी करायची, घाम घाळायचा पण, हाता पगार नाही. कुटुंबाची आर्थिक ओडाताण होत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

या नाराजीतून आणि तणावामुळे कर्मचाऱ्यांने आत्महत्या केली आहे. एसटी कर्मचाऱ्याला यापूर्वी कधीही असे पाऊल उचलावे लागले नाही. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी आली तरी हातात पैसे नाहीत. त्या पार्श्वभूमी अनिल परब यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. 

आत्महत्येमुळे कुटुंबाला त्याचा त्रास होतो कुटुंब रस्त्यावर येत याकडे लक्ष वेधत परब म्हणाले, की दिवाळी आधी 1 पगार मिळेल आणि दिवाळीनंतर 1 पगार मिळेल 
पूर्णपणे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. बॅंकेकडे कर्जही मागितले आहे. टप्प्या, टप्प्याने सगळ्या गोष्टी होतील.आज 1 तासात 1 पगार आणि सणाचा अनुग्रह मिळेल असे आश्वासनही अनिल परब यांनी दिले आहे. 

राज्य शासनाकडे एक रक्कमी पैसे मागितले आहे. आज जे पैसे एसटीला दिले जात आहे त्यामुळे उत्पन्न पगार परत नाही. डिझेल तसेच एसटीला लागणारे सामान या महत्त्वाच्या गोष्टी पहावया लागतात असे सांगून परब म्हणाले, की मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालय, अजित पवार यांच्यासोबत बोलणं सुरू आहे. राज्य शासनाला प्रस्ताव दिलाय की काही दिवस तरी कर्मचाऱ्यांना पगार द्यावे. पैसे आणण्याचे स्तोत्त वाढवण्यास मदत होईल 

एसटीला राज्य शासनाने मदत केली आहे यापुढेही करेल. पैशांची तजवीज करायला हवी. थकीत पैसे काढून ते त्यांना देणं महत्वाचं आहे. आज सकाळपासून त्याबाबत बैठक सुरू आहे. 1 पगाराचा प्रश्न सुटला आहे आणि 1 पगाराचा प्रश्न दिवाळीपर्यंत सुटेल. अनेक माध्यमातून पैसे एसटी मध्ये येईल याची प्रयत्न सुरू आहेत असेही परब यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख