एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पैसे देण्याचा प्रयत्न : अनिल परब  - ST employees try to pay before Diwali: Anil Parab | Politics Marathi News - Sarkarnama

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पैसे देण्याचा प्रयत्न : अनिल परब 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्याच्या थकीत वेतनाबाबत कर्मचारी संघटना आवाज उठवित आहे.

मुंबई : एसटी महामंडळ प्रचंड तोट्यात आहे. आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की, दिवाळीआधी त्यांचे पैसे द्यायचे आहेत अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकारांना दिली. 

गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्याच्या थकीत वेतनाबाबत कर्मचारी संघटना आवाज उठवित आहे. दिवाळी आली तरी पैसे मिळत नाही अशी ओरड कर्मचारी करीत आहेत. मंत्री अनिल परब हे कर्मचाऱ्यांना त्यांचे पैसे देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. 

आज एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत बोलताना परब म्हणाले,की कर्मचाऱ्यांची थकित देण्यासाठी प्रसंगी बॅंकांतून कर्ज काढून पैसे देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी कामगार आयुक्तांकडे जावं की नाही यासाठी हा त्यांचा प्रश्न आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत सोमवारी बैठक आहे. त्यावेळी निर्णय होणे अपेक्षित आहे. 

मराठा मशाल मोर्चाबाबत बोलताना परब म्हणाले, की पदवीधर निवडणुकांची आचारसंहिता आहे.त्यामुळे मोर्चाला परवानगी नाही. त्यांना निवेदन देण्यासाठी सांगितलं आहे 
सामाजिक तेढ निर्माण होईल असे करू नका .त्यांचे प्रश्न सोडवण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे. मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्याबाबत प्रयत्न करूच. पंढरपूर ते मंत्रालयात दिंडी काढणाऱ्यांचा निवेदन मुख्यमंत्रांकडे दिले आहे. 

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीबाबत ते म्हणाले, की याबाबत राज्यपाल लवकरच निर्णय देतील. आम्ही कायदेशीर प्रक्रिया पार केली आहे. आमच्या मनात कोणताही सवाल नाही. राज्यपाल देखील त्यांची प्रक्रिया योग्यरितीने पार पाडतील अशी अपेक्षा आहे असेही अनिल परब यांनी यावेळी सांगितले. 

हे ही वाचा : 

संजय राऊत म्हणतात, ""राज्यपालांवर आमचं अन्‌ आमच्यावर त्यांचं प्रेम '' 

मुंबई : शिवसेनेच्या यादीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे नाव आहे. तेज तराफ बोलणारी आणि देशाबाबत माहिती असणारी अभिनेत्री विधान परिषदेवर गेली तर उत्तमच असे सांगत राज्यपालावर आमचं आणि आमच्यावर त्यांचं किती प्रेम आहे हे देशाला माहीत आहे.

 ते कोणताही राजकीय बखेडा निर्माण करणारी नाही, ते सूज्ञ आहेत असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

मुंबईत माध्यमांशी बोलताना अमेरिका निवडणूक, नितीशकुमार आणि राज्यातील विधान परिषद निवडणुकीबाबत भाष्य केले. राऊत म्हणाले, की राज्यपाल घटनेविरोधात काम करणार नाहीत. राज्यपालांना विनंती, आपल्या निर्णयाचा आम्ही सन्मान करू. राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तिन्ही पक्षांनी दिली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख