भाषणात सांगायचं शिवसैनिक माझा श्वास, त्यानंतर  फाट्यावर, निलेश राणेंची ठाकरेंवर टीका  - In the speech, Shiv Sainik, my breath, then on the crack, Nilesh Rane's criticism on Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

भाषणात सांगायचं शिवसैनिक माझा श्वास, त्यानंतर  फाट्यावर, निलेश राणेंची ठाकरेंवर टीका 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

तिवारींच्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर निशाणा साधणार नाहीत तर ते निलेश राणे कसे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मिळत नाही. फोन उचलत नाहीत अशी नाराजी नेहमीच व्य्क्त केली जाते. शिवसेनेचे एक आमदार आणि शेतकरी नेते किशोरी तिवारी यांनी चक्क मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरच टीका केली आहे. ते आमचा फोन उचलत नाहीत अशी त्यांची तक्रार असते. 

तिवारींच्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर निशाणा साधणार नाहीत तर ते निलेश राणे कसे. तिवारींनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर काही वेळापूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी ट्‌विट करीत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. 

राणे यांनी म्हटले आहे, की मुख्यमंत्र्यांना 50 फोन करून सुद्धा फोन उचलत नाही आणि भेटत नाही अशी एका शिवसेना आमदाराची तक्रार. एका शिवसेना आमदाराची अशी परिस्थिती असेल तर सामान्य शिवसैनिकांची अवस्था किती बिकट असेल ह्यावरून लक्षात येतं. फक्त भाषणातून सांगायचं शिवसैनिक माझा श्वास आहे नंतर शिवसैनिक फाट्यावर. 

ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे असोत की निलेश, नितेश. हे तिघेही शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तसेच या तिघांचाही समाचार घ्यायला शिवसेनेचे वैभव नाईक, खासदार विनायक राऊत सज्ज असतात. राणे आणि शिवसेनेचे नेते नेहमीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत असतात. आजही निलेश राणे यांनी किशोर तिवारींच्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. 

गेल्या शुक्रवारी तिवारी यांनी राज्यपालांची भेट घेऊन विदर्भ आणि मराठवाड्याचील अनुशेष भरून काढण्याची मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री भेटत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. 

हे ही वाचा : 
एकनाथ खडसे म्हणतात, पक्षासाठी जंगलात देखील मुक्काम केला !
 शहादा : पक्षाच्या विस्तारासाठी मी प्रचंड कष्ट घेतले होते. प्रसंगी जंगलात देखील मुक्काम केला, मात्र कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवल्या. मला नंदुरबार जिल्ह्याचा पूर्ण अभ्यास आहे. गट तट विसरुन कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवल्या तर आगामी काळात नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा पहिल्या क्रमांकावर येईल, असे माजी मंत्री एकनाख खडसे म्हणाले.  

गृहमंत्री अनिल देशमुख शुक्रवारी शहादा दौऱ्यावर आले होते. यावेळी लोणखेडा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली. यावेळी श्री. खडसे बोलत होते. ते म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यावर कायम काँग्रेसचे प्रभुत्व राहिले. जिल्ह्यातील एकही गाव असे नाही, जिथे नाथाभाऊ पोहोचला नाही. गेल्या काळात पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. जंगलात मुक्काम केला, कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवल्या. मला जिल्ह्याचा पूर्ण अभ्यास आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख