मुंबईत बकरी येवू द्यायची नाहीत, असा आदेश काढण्यात आलेला नाही! - sop followed by government on bakari ed occasion satej patil says | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईत बकरी येवू द्यायची नाहीत, असा आदेश काढण्यात आलेला नाही!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 30 जुलै 2020

सर्वांना विश्वासात घेवून 'एसओपी' बनवण्यात आली आहे. त्यापद्धतीने काम सुरू आहे.

मुंबई: बकरी ईदसाठी मुंबईत आणली जाणारी बकरी येवू द्यायची नाहीत किंवा ती थांबवायची, असा कोणताही आदेश शासनाकडून देण्यात आला नसल्याचे गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील यांनी सांगितले.

मंबईत येणारी बकरी थांबवण्यात येत असल्याचा आरोप होत असल्याच्यासंदर्भाने सतेज पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सर्वांना विश्वासात घेवून 'एसओपी' बनवण्यात आली आहे. त्यापद्धतीने काम सुरू आहे. बकरी येवू द्यायची नाहीत किंवा ती थांबवायची, असा कोणताही आदेश शासनाकडून देण्यात आलेला नाही. सर्वांनी शांततेत ईद साजरी करावी, असे पाटील म्हणाले.

सोलापूर जिल्हा प्रशासनाचे आवाहन

कोरोना विषाणूमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यानुसार नागरिकांनी बकरी ईद नमाज घरीच अदा करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

याबाबत राज्य शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. तसेच कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका, पोलीस प्रशासन, जिल्हा  प्रशासन यांनी केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे नमूद केले आहे.

या कालावधीत सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील, जनावरे ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीद्वारे नोंदणी करुन खरेदी करावीत. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईदनिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही, असे मार्गदर्शक सूचनामध्ये नमूद करण्यात आले आहेत.

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांवर

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असून हे प्रमाण ५९.८४ टक्के एवढे झाले आहे. बुधवारीदेखील ७४७८ रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३९ हजार ७५५ झाली आहे.आज ९२११ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४६  हजार १२९  रुग्णांवर (एक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात ८ लाख ८८ हजार ६२३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४० हजार ७७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६१ टक्के एवढा आहे.  राज्यात आज २९८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६१ टक्के एवढा आहे.

Edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख