आठवले घरी येताच आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करीत धरला ठेका !  - As soon as Athavale came home, RPI workers happily held the contract! | Politics Marathi News - Sarkarnama

आठवले घरी येताच आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करीत धरला ठेका ! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना मुंबईतल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

मुंबई : कोरोनाचा संसर्ग झाल्याने रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले गेल्या काही दिवसापासून एका खासगी रुग्णालयात होते. त्यांना आज घरी सोडण्यात आल्यांनतर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त ठेका धरला. त्यांच्या मुंबईतील निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना मुंबईतल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अभिनेत्री पायल घोष हिने गेल्या ऑक्‍टोबररोजी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला होता. या कार्यक्रमाला अनेक जण उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर आठवले यांना खोकला व अंगदुखीची लक्षणे जाणवायला लागली.

त्यांनी कोरोनाची चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह निघाले होते. त्यांच्याप्रमाणेच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनाही कोरोना झाला होता. त्यांच्या पाठोपाठआता खासदार सुनील तटकरे व त्यानंतर आठवले यांना कोरोनाची लागण झाली होती. 

आठवले यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्यानंतर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करीत त्यांच्या निवासस्थानासमोरच ठेका धरला. ढोलताशाच्या गजरात काही महिलांसह कार्यकर्त्यांनी नृत्य केले. 

हे ही वाचा : 
दिवाळीत ही दक्षता घ्या, तरच कोरोनाची संभाव्य वाढ थांबेल !

नाशिक :  जिल्ह्यात जनावरांच्या विक्रीसह आठवडे बाजार सुरु करण्यात येत आहे. परंतु या बाजाराचे कामकाज करतांना कोविड 19 चा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने यापूर्वी देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे लागेल. विशेषतः नागरिकांनी मास्कचा वापर, सामाजिक अंतर आदींचे सक्तीने अवलंब करणे बंधनकारक राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

यासंदर्भात जिल्हाधिकारी म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत.

शुक्रवारी कोरोना संदर्भात प्रतिबंधक तसेच विविध उपाय योजनांच्या नियोजनाच्या दृष्टीने प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलसि आयुक्त, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह समितीचे इतर सर्व सदस्यांच्या उपस्थितीत त्याबाबत चर्चा झाली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख