रतन टाटा, सनी लिओनीच्या कारचा वापर दुसराच कोणीतरी करतोय

बनावट नंबरप्लेटची २४१ प्रकरणे उघड झाली आहेत.
Sarkarnama Banner - 2021-07-24T105548.017.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-24T105548.017.jpg

मुंबई : अभिनेत्री सनी लिओन हिच्या कारच्या नंबर प्लेटचा वापर दुसराच कोणीतरी करत असल्याचे तपासात उघड झाल्यानंतर वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी सनीला वाहतूक पोलिस शाखेकडून वारंवार ई-चलन पाठविण्यात आले. सनी लिओन, उद्योगपती रतन टाटा यांच्यासह २४१ बनावट नंबरप्लेटची प्रकरणे उघड झाली आहेत. त्यांच्या नावावर असलेल्या कारचा बनावट क्रमांक वापरुन अनेक गाड्या फिरत असल्याचे समोर आले आहे. Someone using the car of Ratan Tata and Sunny Leone 

गेल्या सहा महिन्यात ई-चालानच्या माध्यमांतून 241 बनावट नंबरप्लेटची प्रकरणं उघडीस आली आहे. याप्रकरणी 17 जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. उद्योगपती रतन टाटा यांनाही या बनावट नंबरप्लेटमुळे नियम मोडल्याप्रकरणी वाहतूक पोलिस  शाखेकडून ई चलन पाठविण्यात आले. त्यावेळी टाटा यांनाही आश्चर्य वाटले. गेल्या सहा महिन्यात सुमारे 39 हजार 950 तक्रारी वाहतुक पोलिसांकडे आल्या आहेत. यात चार हजार 105 तक्रारींमध्ये चुकून ई-चालान पाठवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. 

विशेष म्हणजे अशा प्रकरणांची तपासणी करत असताना 241 बनावट नंबर प्लेटची प्रकरण उघडीस आली आहेत. त्यातील तीन चोरीच्या गाड्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.  तर दोन प्रकरणांमध्ये नंबरप्लेट नोंदणीकृत नसल्याचेही उघड झाले आहे. तर उर्वरीत 12 प्रकरणांमध्ये बनावट नंबरप्लेटचा वापर झाल्याचे वाहतुक पोलिसांच्या तपासणीत समजले आहे. मुंबईत सरासरी 9 हजार वाहनांना दररोज ई-चालान पाठवण्यात येते.


राज कुंद्रा याच्या 'प्लॅन बी'तून नवीन धक्कादायक खुलासा
मुंबई : उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा  Raj Kundra याला अश्लील चित्रपट बनवणे आणि वेगवेगळ्या माध्यमातून विकण्याच्या आरोपाखाली मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे.कुंद्राच्या येस बँकेमध्ये ऑनलाइन बेटिंग आणि कसिनो गेमिंग करणाऱ्या मरक्यूरी इंटरनॅशनल कंपनीच्या युनायटेड बँक ऑफ आफ्रिका या खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे आल्याचे दिसून आले. त्यामुळे कुंद्रा हा हॉटशॉट अँपद्वारे कमावलेले पैसे इंटरनॅशनल कंपनी मार्फत अथवा ऑनलाईन बॅटिंग द्वारे प्राप्त करीत होता, असे तपासात समोर आले आहे. त्यांचा 'प्लॅन बी' कोणता होता हे तपासात समोर आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com