सोमय्या यांची अमित शहांकडे ही मागणी... - somayya on sachin vaze | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

सोमय्या यांची अमित शहांकडे ही मागणी...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 17 मार्च 2021

मनसुख हिरेन यांची हत्याच झाल्याचा सोमय्यांचा आरोप 

भिवंडी : ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली, असा खळबळजनक आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भिवंडीत केला. राज्य शासनाच्या आदेशानुसार भिवंडीत कोविड लसीकरण केंद्र महानगरपालिकेने सुरु केले आहे. मात्र या लसीकरण मोहिमेस अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत आहे, तसेच लसीकरण केंद्रावर गेलेल्या नागरिकांना योग्य पद्धतीने वागणूक दिली जात नाही, अशी तक्रार सोमय्या यांच्याकडे आली होती. 

त्याची शहानिशा करण्यासाठी भिवंडी शहरातील विविध लसीकरण केंद्रांना भेटी देऊन डॉक्टर व महापालिका आयुक्त डॉ पंकज आशिया यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सोमय्या म्हणाले, लसीकरणासाठी नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण केला गेला पाहिजे. त्यासाठी महापालिका आयुक्त प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

मयत मनसुख हिरेन परिवाराची भेट घेतली असून या भेटीदरम्यान हिरेन परिवार प्रचंड तणावात असल्याचे आढळले असून ठाकरे सरकारच्या वाझे गँगकडून त्यांच्या पत्नी व परिवाराला धमक्या येत आहेत. परिणामी हिरेन परिवाराला सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी विनंती व मागणी लेखी पत्राद्वारे आपण एनआयए यंत्रणा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली असल्याचेही सोमय्या यांनी यावेळी सांगितले. मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अपारदर्शकपणे व घाईघाईने 5 जून 2020 रोजी सचिन वाझे यांना पुन्हा पोलिस सेवेत घेतले. यामागे नेमका काय हेतू होता, याची देखील चौकशी व्हावी, अशा मागणीचे पत्र आपण एनआयएला दिले असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख