स्मृती इराणी यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना `बकरा` बनविले तेव्हा!

प्रवक्ते केशव उपाध्ये, महाराष्ट्र महिला मोर्च्याच्या अध्यक्षा उमा खापरे, औरंगाबादचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्याशी स्मृती इराणी आवाज बदलूनबोलल्या. पण एकालाही धड त्यांना नीट ओळखता आले नाही.
smruti irani
smruti irani

पुणे : राजकारण म्हणजे सतत काहीतरी गंभीरपणे चेहरा करून बसणे असे नसते. त्यात राजकीय नेत्यांनी जाहीरपणे चेष्टामस्करी करणे तर एकदमच निषिद्ध मानले जाते. त्यांच्या कोणत्या विधानाचा कधी काय अर्थ घेतला जाईल, याचा नेम नसतो. पण खासगीतही नेत्यांना असेच गंभीरपणे वागावे लागते. याला अपवाद ठरल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या. त्यांनी तर महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांची विकेट घेतली.  इराणींच्या या फिरकीमुळे अनेकांची धांदल उडाली. 

स्मृती इराणी आणि विजया रहाटकर या रविवारी जेव्हा दिल्लीत भेटल्या, तेव्हा शिळोप्याच्या गप्पागोष्टी चालू होत्या. त्या दोघी चांगल्या मैत्रिणी. रहाटकर यांना आवर्जून दिल्लीमध्ये आणण्याचे श्रेय इराणींचे. इराणी या महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्षा असताना त्यांनी विजया रहाटकर यांना औरंगाबादच्या महापौरपदावरून थेट महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून खूप आग्रहाने दिल्लीत आणले होते. तेव्हापासून त्या दोघींची चांगलीच मैत्री. राजकारणापलीकडची. संडे मूडमध्ये इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी चालू असताना इराणींना एकदम भलतीच आयडिया सुचली. त्या म्हणाल्या, “ताई, चल जरा सगळ्यांची मजा घेऊ.” आणि मग काय...एकापाठोपाठ एक ‘प्रँक कॅल्स’ चालू झाले. 

विविध टिव्ही चॅनेल्सवर असे बकरे बनविण्याचे कार्यक्रम सुरू असतात. त्यात इराणी यांनी पहिला क्रमांक लावला तो श्रीकांत भारती यांचा. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी असलेले भारतीय आता महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस झाले आहेत. त्यांच्याशी इराणी एकदम वेगळ्याच आवाजात बोलू लागल्या. त्यांना काहीच समजेनासे झाले...जेव्हा खरोखरच भारतीय हतबल झाले, तेव्हा त्यांना इराणींनी खरेखरे सांगितले. त्यानंतर मग असेच वेगवेगळ्या आवाजांत त्या भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, महाराष्ट्र महिला मोर्च्याच्या अध्यक्षा उमा खापरे, औरंगाबादचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्याशी बोलल्या. पण एकालाही धड त्यांना नीट ओळखता आले नाही. एकीकडे ही मंडळी ‘बकरे’ बनत असताना दुसरीकडे इराणी आणि रहाटकर मात्र पोट धरधरून हसत होत्या. या धमाल गमतीनंतर इरानींनी प्रत्येकाची आस्थेवाईकपणे चौकशी केली आहे. उमा खापरेंना तर पुरण पोळीची फर्माईश केली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com