सीताराम कुंटेंच्या 'त्या' अहवालावर ठरणार रश्मी शुक्ला खऱ्या की खोट्या!

रश्मी शुक्ला यांनी पोलिस अधिकाऱ्यांचे फोन टॅप करताना सीताराम कुंटे यांची परवानगी घेतल्याचे म्हटले आहे.
Sitaram Kunte will submit report on phone tapping says Deputy cm Ajit pawar
Sitaram Kunte will submit report on phone tapping says Deputy cm Ajit pawar

मुंबई : राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलिस अधिकाऱ्यांचे फोन टॅप करताना गृह विभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची परवानगी घेतल्याचे म्हटले आहे. पण अशी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा दावा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केला आहे. 'कुंटे हे सध्या राज्याचे मुख्य सचिव असून त्यांच्याकडे याबाबतचा सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे,' अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

रश्मी शुक्ला यांचा बदली रॅकेटचा गोपनीय अहवाल समोर आला आहे. यामध्ये अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी पैशांची देवाणघेवाण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यासाठी शुक्ला यांनी अधिकाऱ्यांचे फोन टॅप केले होते. शुक्ला यांनी सरकार स्थापनेच्यावेळी नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच शुक्ला यांनी फोन टॅपिंगसाठी कुणाचीही परवानगी घेतली नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

शुक्ला यांनी त्यावेळी कुंटे यांची परवानगी घेतल्याचे अहवालात म्हटले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुंटे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांच्याकडून याबाबत अहवाल मागविण्यात आला आहे. पुढील एक-दोन दिवसांत हा अहवाल सरकारला प्राप्त होईल. त्यातून फोन टॅपिंगसाठी त्यांनी परवानगी घेतली होती किंवा नाही, हे स्पष्ट होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

मंत्रीमंडळ मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी

राज्यातील सध्याच्या घडामोडींवर मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळातील सर्व सहकाऱ्यांशी चर्चा केली आहे. तसेच सरकारमधील सर्व पक्षांच्या प्रमुखांशीही त्यांनी चर्चा केली आहे. मंत्रीमंडळ मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले.

दरम्यान, रश्मी शुक्ला यांचा अहवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह सचिवांकडे सादर केला आहे. त्यांनी या अहवालाच्या आधारे चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणासह विविध घटनांबाबत राज्य सरकारकडून अहवाल मागवावा, अशी मागणी काल भाजपने राज्यपालांकडे केली आहे. आज महाविकास आघाडीतील नेते राज्यपालांची भेट घेणार होते. मात्र, राज्यपाल नसल्याने त्यांना भेट घेता आली नाही.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com