प्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश 

गायिका वैशाली माडे या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या आहेत.
 Ajit Pawar, Dhananjay Munde, Supriya Sule, Vaishali Made .jpg
Ajit Pawar, Dhananjay Munde, Supriya Sule, Vaishali Made .jpg

मुंबई : सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे (Vaishali Made) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. पक्षप्रवेश सोहळा आज पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, (Dhananjay Munde) उपस्थित होते. (Singer Vaishali Made joins NCP)

या बाबात अजित पवार यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये ते म्हणाले की ''सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांचा राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागामध्ये प्रवेश तसेच त्यांची विदर्भ विभागाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! 

गायिका वैशाली माडे या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या आहेत. सर्वसामान्य घरातील मुलगी ते चित्रपट सृष्टीतील नामवंत गायिका हा वैशाली यांचा थक्क करणारा प्रवास अतिशय संघर्षाचा आहे. 'झी' वरील मराठी आणि हिंदी अशा दोन्ही स्पर्धांचे विजेतेपद पटकावल्याने वैशाली यांचे देशभरात चाहते आहेत. त्यांच्या प्रवेशाच्या माध्यमातून विदर्भातील कलाकारांना पक्षाशी जोडण्याचा राष्ट्रवादीचा मानस आहे. 

कोण आहेत वैशाली माडे 

वैशाली माडे या एक सुप्रसिद्ध गायिका आहेत. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील खार तळेगाव येथे झाला. त्यांचे लग्न वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे अनंत माडे यांच्याशी झाले.  माडे या 2008 मध्ये 'सा रे ग म प'च्या पर्वाच्या विजेत्या ठरल्या होत्या. हाच त्यांच्या आयुष्याचा 'टर्निंग पाँईंट' ठरला. 2009 मध्ये त्यांनीही हिंदी 'सा रे ग म प'मध्ये त्या 'टॉप थ्री'मध्ये पोहोचल्या होत्या. त्यानंतर त्यांन आपल्या जादूई आवाजाच्या बळावर त्यांनी 'सा रे ग म प' च्या हिंदी पर्वातही बाजी मारत संगीत जगताला आपल्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली.

गेल्या दशकभरात अनेक हिंदी-मराठी गाणी त्यांनी गायली आहेत. अनेक मराठी मालिकांची 'टायटल साँग' माडे यांनी गायिली आहेत. यामध्ये  'कुलवधू', 'होणार सुन मी या घरची', 'माझ्या  नवऱ्याची बायको' या मालिकांचा समावेश आहे.  माडे यांना त्यांच्या गीतांसाठी अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले. तर अनेक नामवंत पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. 

वैशाली माडेंनी गाणे गायलेले काही चित्रपट

मराठी चित्रपट : 
इरादा पक्का (2010)
मध्यमवर्ग (2014)
हंटर (2015)
कॅरी ऑन (2015)
31 दिवस (2018)
रणांगण (2018)
आटपाडी नाईट्स (2019)

 हिंदी चित्रपट

दमादम्म (2011)
बाजीराव मस्तानी : (2015)
अंग्रेजी में कहते है : (2017)
कलंक : (2019) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com