कोरोनातून बऱ्या झाल्या ; पण आगीत होरपळून मृत्यू

आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी होणार होती, मात्र आगी मुळे त्यांनी जगाचाच निरोप घेतला. यामुळे त्यांच्या दोन लहान मुली अनाथ झाल्या आहेत.
shma Mhatre .jpg
shma Mhatre .jpg

विरार : आज पहाटे विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये क्षमा अरुण म्हात्रे या महिलेचाही मृत्यू झाला. क्षमा म्हात्रे या रुग्णालयात कोरोनावर एक महिन्या पासून उपचार घेत होत्या. त्यामध्ये त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यांना आज रुग्णालयातून सुट्टी होणार होती, मात्र आगी मुळे त्यांनी जगाचाच निरोप घेतला. यामुळे त्यांच्या दोन लहान मुली अनाथ झाल्या आहेत. 

कळंब हे गाव वसई तालुक्यातील मच्छीमारांचे गाव म्हणून ओळखले जाते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या गावातील क्षमा म्हात्रे या पहिल्या रुग्ण ठरल्या होत्या. त्यांच्यावर विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात गेल्या एक महिन्या पासून उपचार सुरू होते. कोरोना मधून त्या बऱ्या ही झाल्या. आज  त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळणार होती. परंतु दुर्देवाने पहाटे रुग्णालयाला लागलेल्या आगीत होरपल्ल्याने त्यांनी ह्या जगाचाच निरोप घेतल्याचे समोर आले आहे. 

क्षमा म्हात्रे या 45 वर्षाच्या होत्या त्यांना दोन मुली असून त्या आता अनाथ झाल्या आहेत. कळंब गावावर या घटनेने शोककळा पसरली आहे. कळंब हे गाव रेड झोन मध्ये येत असून या ठिकाणी दिवसा आड 1/2 मृत्यू होत आहेत. गेल्या आठवड्याभरात 7 ते 8 जण मृत्यू मुखी पडले असतानाही याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत नाही. दुकाने ही उघडी असून मच्छीमार्केटमध्ये मोठ्या प्रमाणत गर्दी बघायला मिळत असल्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
 
दोन दिवसांपासून एक पत्रकार आपल्या काकासाठी ऑक्सिजन बेड शोधत होते, पण त्यांना तो मिळत नव्हता अखेर पर्वा त्यांना विजय वल्लभ रुग्णालयात तो मिळाला होता. पण त्यांचे दुर्देव आज लागलेल्या आगीत जनार्धन म्हात्रे यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागातील (आयसीयू) एसीचा स्फोट झाला. या अतिदक्षता विभागात १७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला परंतु, आयसीयूतील 13 रुग्णांचा मात्र, मृत्यू झाला. या रुग्णालयात एकूण ९० जणांवर उपचार सुरू होते.  

Edited By - Amol Jaybhaye
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com