शिवसेनेचा गृहमंत्र्यांचा सल्ला 'वेळीच पावले उचला'

आसाम आणि मिझोराम मध्ये सध्या सुरू असलेल्या वादावर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून टीका केली आहे.
शिवसेनेचा गृहमंत्र्यांचा सल्ला 'वेळीच पावले उचला'
2Sarkarnama_20Banner_20_284_29_42.jpg

मुंबई : आसाम आणि मिझोराम मध्ये सध्या सुरू असलेल्या वादावर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून टीका केली आहे. दोन राज्यांतील सीमावादाने उग्र स्वरूप धारण केले. हिंदुस्थान-पाकिस्तान किंवा चीनच्या सीमेवर दोन सैन्यांत गोळीबार, संघर्ष होतो, तसा रक्तरंजित लढा दोन राज्यांतील पोलिसांत झाला. त्यात काहीजणांचे बळी गेले. अमित शहा (Amit Shaha) यांनी वेळीच पावले उचलून आसाम आणि मिझोराम (Asam Mizoram) या दोन राज्यांतील झगडा मिटवायलाच हवा,अश अपेक्षा अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यालयातील काळी बाहुली हटवा
एका बाजूला आपण म्हणायचे की, कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हिंदुस्थान एक आहे, विविधतेत एकता आहे, पण प्रत्यक्षात चित्र काय दिसते? भारतीय संस्कृतीवर चर्चा आपण करतो तेव्हा काय सांगतो? येथे केवळ दुःखं वाटून घेतली जातात. त्याच वेळी आपण जात, धर्म आणि राज्यांच्या सीमांवरून खुनी खेळ करीत आहोत. जम्मू-कश्मीरात अशांतता आहेच. त्यात आसाम-मिझोरामच्या जमिनीच्या भांडणात रक्तपात झाला आहे. दोन राज्यांच्या पोलिसांनी एकमेकांवर बंदुका चालवल्या. यास देशांतर्गत युद्धच म्हणावे लागेल. याचा फायदा बाजूचे शत्रू राष्ट्र उठवल्याशिवाय कसे राहतील? मिझोराम, मणीपुरात चिनी माओवाद्यांचे गट कार्यरत आहेत. त्यांना अशाने बळ मिळेल, अशी भीती सामनाच्या अग्रलेखात व्यक्त करण्यात आली आहे. 
नारायण राणेंची पाठराखण करायला फडणवीस सरसावले! 
पाकिस्तानमध्ये जाऊ नये, म्यानमारमध्ये प्रवास करू नये. अगदी अमेरिका, युरोपसारख्या राष्ट्रांनी त्यांच्या नागरिकांवर सुरक्षा व आरोग्याच्या कारणास्तव हिंदुस्थानात प्रवेशाबाबत निर्बंध घातले होते, पण देशांतर्गत निर्बंधांचे प्रकरण हे बहुधा प्रथमच घडताना दिसत आहे व राष्ट्रीय एकता, एकात्मता, अखंड भारत या संकल्पनांना तडा देणारे हे प्रकरण आहे, असे अग्रलेखात म्हटलं आहे.

  • तणावाचे विषय केंद्राशी संबंधित असल्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांना विशेष लक्ष द्यावे लागेल. 
  • आसाम व मिझोराम ही ईशान्येकडील दोन राज्ये भारतावर नकाशावर आहेत, पण दोन राज्यांतील सीमावादाने उग्र स्वरूप धारण केले. 
  • सीमेवर दोन सैन्यांत गोळीबार, संघर्ष होतो, तसा रक्तरंजित लढा दोन राज्यांतील पोलिसांत झाला. त्यात काहीजणांचे बळी गेले.

 Edited by : Mangesh Mahale 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in