"भाजपनं पनवती म्हणून राणेंना अडगळीत टाकलं..राऊतांचा हल्लाबोल.. . - shivsena mp vinayak raut criticizes bjp leader narayan rane | Politics Marathi News - Sarkarnama

"भाजपनं पनवती म्हणून राणेंना अडगळीत टाकलं..राऊतांचा हल्लाबोल.. .

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 मे 2021

भूखंड हडप करणारे म्हणजे नारायण राणे. त्यांचा अनुभव हा भ्रष्टाचारातून आलेला आहे.

मुंबई : "भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणून नारायण राणे यांचा उल्लेख होतो. भाजपनं (BJP) पनवती म्हणून नारायण राणेंना (Narayan Rane) अडगळीत टाकलेले आहे. त्यांना कावीळ झालेली आहे. ते अजून कोकणातही गेलेले नाहीत,' अशी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak raut) यांनी केली आहे.  विनायक राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. shivsena mp vinayak raut criticizes bjp leader narayan rane 

नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर तौते चक्रीवादळाच्या मदतीवरून  टीकास्त्र सोडले होते. त्यांच्या या टीकेला विनायक राऊत  उत्तर दिले. राऊत म्हणाले की, भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणून राणेंचा उल्लेख होतो. त्यांच्या रूग्णालयातच आरटीपीसीआरसाठी जादा पैसे घेतले जात आहे. भूखंड हडप करणारे म्हणजे नारायण राणे. त्यांचा अनुभव हा भ्रष्टाचारातून आलेला आहे.

"त्यांचा बापही मला अटक करु शकत नाही.." रामदेव बाबाचे पुन्हा वादग्रस्त विधान

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांनी फाईल गहाळ झाल्याची चर्चा होती, त्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका करीत म्हटलं होते की राजभवनातील फाईल कोणत्या भुतांनी नेली. यावर राणे यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, राज्यपालांवर ठराविक वेळेतच नावे मंजूर करण्याचे बंधन नाही. भुताटकी मंत्रालय, वर्षा व मातोश्री इथं आहे. तिथं शांती घाला.

यावर विनायक राऊत यांनी राणेंना जशास तसे उत्तर दिले आहे. राऊत म्हणाले, "राणेंनी स्वतःच्या घरात शांती घालावी, वर्षा, मातोश्री ही दैवतांची घरे आहेत." 'चिपी विमानतळाचा वाद विनाकारण उकरून काढला जात आहे. मुळात चिपी विमानतळ नारायण राणेंच्या कारकिर्दीत प्रायव्हेट ऑपरेटरला दिलेली आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास 15 दिवसांत विमानतळ सुरू होईल' असे राऊत यांनी सांगितले.  

राऊत म्हणाले की, पदोन्नती आरक्षणावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली आहे. पदोन्नतीचा प्रश्न वरिष्ठ नेते सोडवतील आणि त्यातून मार्ग निघेल. महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे पूर्ण करेल. कुठलीही समस्या असली तरी त्यातून मार्ग काढला जाईल.  .
 
उद्धव ठाकरे  कोकणात आले पण लोकांना भेटलं नाही. ते लगेच मातोश्रीवर गेले. ते कोकणात पिकनिकला गेले होते का, असा सवाल माजी मुख्यमंत्री, भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याच्या कोकण दैाऱ्यावर टीका करताना विविध विषयांवरुन त्यांच्यावर निशाणा साधला.  त्यानंतर राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना प्रत्युत्तर दिलं

 Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख