...मग तुमची डोकं फुटली म्हणून रडत दिल्लीला जाऊ नका..राऊतांचा कर्नाटक सरकारला इशारा.. - shivsena mp Sanjay Raut warns Karnataka government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

...मग तुमची डोकं फुटली म्हणून रडत दिल्लीला जाऊ नका..राऊतांचा कर्नाटक सरकारला इशारा..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 मार्च 2021

मराठी लोकांवर  अत्याचार सुरू आहे, त्याची दखल जर कोणी घेत नसेल महाराष्ट्राला सर्व ताकदीने बेळगावात उतरावे लागेल," असा इशारा  संजय राऊत यांनी दिला आहे. 

मुंबई : "बेळगावात परिस्थिती चिघळत असेल तर त्याला जबाबदार केंद्र सरकार आहे. या प्रकरणात केंद्र सराकारने हस्तक्षेप करावा,  केंद्र सरकारला पश्चिम बंगालमधील हिंसाचार दिसतो, त्यासंबंधी ते तक्रार करतात. पण गेल्या आठ दिवसापासून मराठी लोकांवर जे अत्याचार, दडपशाही सुरू आहे, त्याची दखल जर कोणी घेत नसेल महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीने बेळगावात उतरावे लागेल," असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. 

राऊत म्हणाले, "सध्या बेळगावाला महाराष्ट्रात आणायचा की नाही ते आम्ही बघू, पण सध्या तिथल्या लोकांना संरक्षणाची गरज आहे. कन्नड वेदीकावाले मराठी माणसांवर हल्ले करीत आहेत. शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ले करीत आहेत. हा एका राजकीय पक्षाचा किंवा सरकारचा विषय नाही, सगळ्या राजकीय पक्षाने यासाठी एकत्र येऊन या संबंधात एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ तात्काळ बेळगावला पाठवायला हवं. मी स्वतः बेळगावला जायचा प्रयत्न करतोय. मी बेळगावात जाऊ शकतो. बेळगाव हा या देशाचा भाग आहे. आम्ही मराठी माणसे तिकडे जायचं म्हटलं की आम्हाला रोखले जाते, बंदुका दाखवतात...आमच्याकडे बंदुका नाहीत का?"

"जर कर्नाटकने कठोर पाऊल उचलयला भाग पाडले तर ती सरकारी पाऊले नसतील ती पाऊले राजकीय असतील. मग तुमची डोकं फुटली म्हणून रडत दिल्लीला जाऊ नका.. कर्नाटक सरकार बेळगावमध्ये अतिक्रमण करीत आहे. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत काही काम करता येणार नाही. तिथे न्यायालयाचा अवमान केला जात आहे. जोपर्यंत मराठी माणसाचे डोकं फोडले जात असतील तर आमचे हात बांधलेले नाहीत. ती ताकद आमच्या हातात सुद्धा आहे. केंद्र सरकार अशा प्रकारचे वाद पेटवून भावनिक वातावरण निर्माण करून त्या राज्यात जे काही सुरू आहे, त्यांचे मंत्री ज्या प्रकरणात अडकले आहेत ते पाहून अशा प्रकारच्या हिंसक संघटनाना, दहशतवादी संघटनांना हाताशी पकडून हे वातावरण तयार केले जात आहे," असा आरोप राऊत यांनी केला आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख