तोल ढासळलेल्या चंद्रकांतदादांवर उपचारांची गरज...राऊतांचा पलटवार - shivsena mp sanjay raut slams chandrakant patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

तोल ढासळलेल्या चंद्रकांतदादांवर उपचारांची गरज...राऊतांचा पलटवार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 2 जून 2021

चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे. मग तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं 

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देऊन त्यांच्यावर पलटवार केला आहे. आज ते माध्यमांशी बोलत होते. shivsena mp sanjay raut slams chandrakant patil

राज्य सरकार प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलत आहे. उद्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) लग्नासाठीसुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पंतप्रधांनांना पत्र लिहतील, असा टोमणा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काल लगावला. त्यावरुन  राऊतांनी पाटलांवर निशाणा साधला आहे. 

 
चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे, तोल ढासळणाऱ्या व्यक्तीबाबत बोलणं बरोबर नाही, त्यांच्यावर उपचाराची गरज आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर केली.  तुम्हीच म्हणालात ना चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे. मग तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं. त्यांच्यावर उपचाराची गरज असते, असा टोला राऊत यांनी लगावला.  

"सत्ता येणार...सत्ता येणार..हा भाजपचा एककलमी कार्यक्रम.."
मुंबई :  "भाजपचे लोक तारीख पे तारीख देत आहेत. सत्ता येणार...सत्ता येणार...ही भाजपची एकही भविष्यवाणी सत्य होत नाही, त्यामुळेच ते हताश होऊन आघाडी सरकार विरोधात एककलमी कार्यक्रम राबवत आहे," असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. "इतर पक्षातून आलेले आमदार स्वगृही परत जावू नये, म्हणून भीतीने राज्यात लवकरच सत्ता येणार असे सांगत आहेत. परंतु तिन्ही पक्ष एकजुटीने काम करत आहे," असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. अर्थकारक आणि राजकारण यात फरक आहे, अर्थतज्ज्ञांचा सल्ला न ऐकता केंद्र सरकार निर्णय घेत आहे. आपल्या मनाने सरकार निर्णय घेत आहे. नोटबंदी, जीएसटी, कोरोना याबाबत असाच निर्णय घेतला. लोककल्याणकारी योजना बंद केल्यामुळे गरीब जनता अडचणीत आली आहे. मोदी सरकार या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे मलिक यांनी सांगितलं.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख