शिवसेनेचे आमदार रवीद्र वायकर यांच्या तक्रारीची मनपा आयुक्तांकडून गंभीर दखल

पोलिस स्थानकात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे.
ShivSena MLA Ravindra Vaikar's complaint received serious attention from the Municipal Commissioner
ShivSena MLA Ravindra Vaikar's complaint received serious attention from the Municipal Commissioner

मुंबई : जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रवीद्र वायकर यांनी गोरेगाव (पूर्व ) येथील मोहन गोखले मार्ग येथील एका भुखंडावर होत असलेल्या अनधिकृत बांधकाम तसेच पार्कींगची तक्रार मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे  करताच येथील अतिक्रमण जमिनदोस्त करण्यात आले आहे. त्याच बरोबरच पोलिस स्थानकात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. 

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ५२ मधील गोरेगाव (पूर्व) येथील मोहन गोखले पथ, धीरज व्हॅली जवळील न. भु. क्र. ५९६/६२/अ, या ना विकासक्षेत्र आरक्षित मोकळ्या भुखंडावर सातत्याने अतिक्रमणात वाढ होत होती. यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी पी दक्षिण मनपा कार्यालयात तक्रारीही केल्या होत्या. वारंवार तक्रारी करुनही पी दक्षिण विभागाच्या अधिकार्‍यांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही. 

मुंबई महानगरपालिकेच्या परवानगी शिवाय या सदर आरक्षित मोकळ्या भुखंडावर भू माफियांनी अनधिकृत रित्या कब्जा करुन या ठिकाणी या जागेचा वापर व्यावसायिकरणासाठी करण्यात येत होता. पी दक्षिण विभागाचे दुय्यम अभियंते के.जी.लिमये यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करुन सदर अनधिकृत जागेचा वापर करणार्‍यां विरोधात स्थानिक आरे पोलिस स्थानकात एमआरटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

अशाच प्रकारच्या शासन तसेच प्रशासनाच्या मोकळ्या भुखंडावर वाढत जाणारी अनधिकृत बांधकामे वेळीच निष्कासीत अथवा त्यावर वेळीच प्रभावीपणे कारवाई न केल्यास भविष्यात प्रशासनास हे भुखंड अतिक्रमण मुक्त करण्यास अडचणीचे ठरु शकते, असे वायकर यांनी लेखी पत्राद्वारे मनपा आयुक्ताच्या  निदर्शनास आणून दिले.

 आमदार वायकर यांनी तात्काळी ही बाब मुंबई  मनपा आयुक्त चहल यांना कळवली. आयुक्त यांनी देखील या तक्रारीची गंभीर दखल घेत येथील  अतिक्रमण जमिनदोस्त  करण्याचे आदेश पी दक्षिण विभागातील अधिकार्‍यांना दिले. पी.दक्षिण विभागातील अधिकार्‍यांनी तात्काळ कारवाई करीत येथील अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त करीत जमीन अतिक्रमणमुक्त केली. या जागेवर उभ्या राहणार्‍या व्हनिटी व्हॅन तसेच अन्य वाहनेही येथून हलविण्यात यावी, अशी  विनंती त्यांनी मनपा आयुक्तांना केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com