मुख्यमंत्र्यांनी राणेंना अभिनंदनासाठी फोन का केला नाही? : सावंतांनी दिलं उत्तर - ShivSena leader Arvind Sawant criticism of Narayan Rane | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

मुख्यमंत्र्यांनी राणेंना अभिनंदनासाठी फोन का केला नाही? : सावंतांनी दिलं उत्तर

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 जुलै 2021

राणेंना सिंधुदुर्ग पलीकडे कोणी  विचारत नाही, असे सावंत म्हणाले.

मुंबई : केंद्रामध्ये मंत्री पद मिळाल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी फोन केला,  मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोन केला नाही म्हणून नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, कोकणातील खासदार मंत्री झाले तेव्हा राणे यांनी फोन का केला नाही ? असा सवाल शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी केला आहे. 'तेरड्याचा रंग तीन दिवस' अशी टीका सावंत यांनी राणेंवर केली आहे. मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपले अभिनंदन केलं नाही, असे राणे म्हणाले होते. त्याला सावंत यांनी उत्तर दिलं आहे. ShivSena leader Arvind Sawant criticism of Narayan Rane

अरविंद सावंत म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा राणेंनी काय प्रतिक्रिया दिली, कोणत्या शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं ते त्यांनी सांगावं. संकुचित आणि कुत्सित हे दोन उपाधी घेऊन वावरात असत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे देखील शरद पवारांवर टीका करायचे पण त्या टीकेला 'स्टेटस' होता पण आता ज्या पद्धतीने भाषा वापरतात त्या बद्दल कुण्याला आदर आणि आनंद वाटेल.

कॅबिनेटमध्ये काम करताना काय होतं हे कळेल आता त्यांना त्या ठिकाणी सचिव नसतो त्यामुळे त्यांना नक्कीच कळेल. केंद्रात त्या लोकांना डमी लोक हवे आहेत शिवसेनेवर प्रहार करण्यासाठी त्यांचा वापर केला जाईल. राणेंना सिंधुदुर्ग पलीकडे कोणी  विचारत नाही, असे सावंत म्हणाले.

''शिवसेनेला कॉर्नर करणे हा त्यांचा स्वतःचा गैरसमज आहे. त्यांना भाजपात प्रवेश मिळवताना उमेदवारी देणं त्यांच्या मुलांना उमेदवारी देणं शिवसैनिकांना पाडण्याचा प्रयत्न करणार हे सगळं विधानसभेत त्यांनी केलं. हे सगळं करणाऱ्यांकडून आणखी काय अपेक्षा करणार," असा सवाल सावंत यांनी केला आहे.  

मुंडे, खडसे हसत राहिल्या अन् भारती पवार मंत्री झाल्या !  
नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डाँ. भारती पवार यांची काल केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. त्यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. तर दुसरीकडे खासदार डाँ. प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद मिळाले नाही, यावरुन सोशल मीडियात चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारती पवार यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरी उलटसुलट चर्चा करीत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख