मुंबईतील वॉर्डरचनेवरून शिवसेना आणि काँग्रेस आमनेसामने

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात रणनिती ठरवण्यासाठी काँग्रेसची बैठक संपन्न झाली. या बैठकीत वॉर्डनिहाय चर्चा करून प्रत्येक वॉर्डात संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
  UddhavThackeray, Nana Patole .jpg
UddhavThackeray, Nana Patole .jpg

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात रणनिती ठरवण्यासाठी काँग्रेसची बैठक संपन्न झाली. या बैठकीत वॉर्डनिहाय चर्चा करून प्रत्येक वॉर्डात संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. महानगरपालिकेच्या सर्व २२७ जागा स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात काँग्रेस नेत्यांची बैठक पटोले यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री सुरेश शेट्टी, आमदार अमिन पटेल, चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड, संजय निरुपम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशीष दुवा, सोनल पटेल आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, या बैठकीत मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भात चर्चा झाली असून मतदार पुनर्रचना करताना त्यात अनेक त्रुटी झाल्या आहेत. एससी, एसटी, महिलांना यात योग्य ते प्रतिनिधीत्व दिसून येत नाही. काँग्रेस पक्ष सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून सर्व समाज घटकांना न्याय मिळाला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे.

त्यासंदर्भात जेष्ठ नेते जनार्दन चांदूरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून या समितीचा अहवाल मुख्यमंत्री व निवडणूक आयोगाला देण्यात येणार आहे. मुंबई शहराच्या विकासाला डोळ्यासमोर ठेवून हे शहर आणखी चांगले कसे होईल यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे, असे पटोले म्हणाले.
 

 संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरुन शिवसेनेत दोन गट? संजय राऊत म्हणाले...

काँग्रेसच्या अंतर्गत समितीच्या अहवालात म्हटले आहे की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वॉर्ड रचना आणि अरक्षणमुळे काँग्रेसला 40 जागांवर मुंबईमध्ये फटका बसला असल्याचे म्हटले आहे. भाजपचे नगरसेवक जिंकून येतील अशी वॉर्डरचना करण्यात आली होती, असा आरोप काँग्रेसने केला आहे. वॉर्डस्तरीय रचनेवर काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाली. वॉर्ड रचना आणि आरक्षणामुळे समाजातील विविध घटकांना न्याय मिळाला, नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. 

वॉर्ड आरक्षण हे 10 वर्ष असावे अशी शिवसेनेची भूमिका आहे. तर भाजपने केलेली वॉर्डरचना आणि आरक्षण बदलले जावे, अशी भूमिका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडली. वॉर्ड आरक्षणावर चर्चा झाल्याशिवाय कोणताही निर्णय होऊ नये, असे काँग्रेसचे म्हणने आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना काँग्रेस शिष्टमंडळाने भेटद्यावी असे ठरले आहे.

Edited By - Amol Jaybhaye 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com