निवीदा मागे घेण्यासाठी शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधवांची कंत्राटदाराला धमकी ! 

मर्जीतला कंत्राटदार नेमण्यासाठी यशवंत जाधवांकडून धमकी येत असल्याचा आरोप सोलंकी यांनी केला आहे.
 निवीदा मागे घेण्यासाठी शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधवांची कंत्राटदाराला धमकी ! 

मुंबई : शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी निवीदा मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याची तक्रार एका कंत्राटदारांने केली आहे. 
 

मे. यश कॉर्पोरेशनच्या रमेश सोलंकींनी यशवंत जाधव काम मागे घेण्यासाठी धमकी देत असल्याबाबत मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलिसांना तक्रारीचे पत्र दिले आहे. तसे पत्रही त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिले आहे. 

मर्जीतला कंत्राटदार नेमण्यासाठी यशवंत जाधवांकडून धमकी येत असल्याचा आरोप सोलंकी यांनी केला आहे. त्याचबरोबर नगरसेवक, पालिका अधिकारी आणि मर्जीतील कंत्राटदार संघटीत गुंडगिरी करत असल्याचं या पत्रात म्हटले आहे. 

ई वॉर्डातील 209 बीट मधील ई निवीदाअंतर्गत सर्वात लघुत्तम निविदाकार असूनही आपल्याला काम दिलं जात नसल्याची तक्रार सोलंकी यांनी केली आहे. 

यामध्ये, यशवंत जाधव, सौ. मनस्वी तावडे, राकेश सागठिया हे त्रिकुट मर्जीतील कंत्राटदार आणण्यास आग्रही आहे असे पत्रात म्हणटले आहे...सोबतच रमेश सोंलकींनी माझ्यासह माझ्या भागीदारांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्यास या तिघांना जबाबदार धरण्यात यावे असे सोलंकी यांनी या पत्रात म्हटले आहे. 
यशवंत जाधव हे शिवसेनेचे वजनदार नेते आहेत. महापालिकेत त्यांच्या शब्दाला किंमत आहे. 

हे ही वाचा :  
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित उर्मिला मातोंडकरांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश 

मुंबई : मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बॉलिवूडची अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी रश्‍मी ठाकरे यांनी मातोंडकर यांच्या हातावर शिवबंधन बांधले. 

मातोंडकर यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी उत्तर मुंबईतून भाजपचे नेते गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पुढे निवडणुकीनंतर त्यांचे मन काही कॉंग्रेसमध्ये रमले नाही. त्यांनी कॉंग्रेसचा राजीनामा दिला होता.

या वादात उर्मिला मोतोंडकर यांनी उडी घेतानाच कंगना थेट खडे बोल सुनावले होते. त्यानंतर मातोंडकर यांची शिवसेनेशी जवळीक निर्माण झाली. त्यांना शिवसेनेत येण्याचे थेट निमंत्रण मिळाले. त्यांनी होकारही दिला. आज त्यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,रश्‍मी ठाकरे अभिनेते आदेश बांदेकर आदी मंडळी यावेळी उपस्थित होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com