अमित शहांनी जिल्हानिहाय सभा घेतल्या तरी फरक पडणार नाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाजप वाढवण्याचा प्रयत्न करावा, महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात सभा घ्यावी. त्याने शिवसेनेला काही फरक पडणार नाही. सरकारचा एकही खिळा हलणार नाही.
Amit Shah, Sanjay Raut .jpg
Amit Shah, Sanjay Raut .jpg

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाजप वाढवण्याचा प्रयत्न करावा, महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात सभा घ्यावी. त्याने शिवसेनेला काही फरक पडणार नाही. सरकारचा एकही खिळा हलणार नाही. असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

सिंधुदुर्ग येथे अमित शहांच्या हस्ते भाजप खासदार नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन झाले, त्यावेळी शहा म्हणाले होते की, शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द कधीच दिला नव्हता. बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वांना तापी नदीत बुडवले आणि सत्तेवर जाऊन बसले. आम्ही तुमच्या मार्गाने चालत नाही. तुमच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती, अशी टीका शहा यांनी केली होती. त्यावर राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना निशाणा साधला.  

राऊत म्हणाले, शिवसेनेचा मार्ग त्यांना माहीत नाही. त्यांनी शिवसेनेच्या मार्गाचा अभ्यास केला पाहिजे, तो काही डांबरी रस्ता नाही, तो अग्निपथ आहे. शिवसेनेला जे मिळाले ते स्वत:च्या हिंमतीवर मिळाले. आम्हाला सहजासहजी काही मिळाले नाही. दीड वर्षानंतर त्यांना काही गोष्टी आठवल्या असतील. शहा म्हणाले होते की, बंद दाराआड जे झाले ते बाहेर बोलणे आमच्या संस्कृतीत बसत नाही. मग आता त्यांनी कशी काय परंपरा मोडली, असा सवाल राऊत यांनी विचारला. 

हे ही वाचा...

यामध्ये आता चिखलफेक करुन काय मिळणार. आता महाराष्ट्रात परिवर्तन झाले, त्यामुळे संधी निघून गेली. तुम्ही निवडणुकीची तयारी करा २०२४ ला समोरासमोर जे होईल ते बघू, असे राऊत म्हणाले.  

शिवसेनेच्या शब्दकोशात लाचारी हा शब्द नाही. शिवसेनेमुळे अनेकांना सत्ता मिळाली. रणशिंग हा शब्द फक्त शिवसेनेला शोभतो. आम्ही राणेंचा तीन वेळा पराभव केलाय. दोनवेळा विधानसभेत आणि एक वेळ लोकसभेला. त्यांना मंत्रीपद देणे किंवा न देणे हा त्यांचा प्रश्न आहे. कोणाला काय करायचे हे त्यांनी ठरवावे. आम्हाला काय? त्यांना पक्ष मजबूत करण्यासाठी काही लोक हवे असतील, असे संजय राऊत म्हणाले. जे शिवसेनेच्या अंगावर आले त्यांची अवस्था वाईट झाली. ते इकडेतिकडे फिरत असतात, असा टोलाही त्यांनी राणे यांना लगावला. 

Edited By - Amol Jaybhaye 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com