आता दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचे प्रदर्शन करावे!

मते मागण्यासाठी चिखल, माती तुडवीत पोहोचतातच ना? तेव्हा कोणतेही अडथळे येत नाहीत.
Uddhav Thackeray Narendra Modi.jpg
Uddhav Thackeray Narendra Modi.jpg

मुंबई : राज्याला महापुराचा फटका बसला आहे. अनेकांचे घरे, दुकाने उद्धस्थ झाले आहेत. या पुरस्थितीनं सगळ्यानं हादररुन सोडलं आहे. या परिस्थितीवर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाष्य करण्यात आले आहे. तळीयेसारखी गावे अत्यंत दुर्गम जंगलाच्या कुशीत व दऱयाखोऱयांत आहेत. तेथे पोहोचणे अवघड असते हे मान्य, मग इतक्या वर्षांत अशा गावांत दळणवळण, रस्ते, संपर्क व्यवस्थेची सोय कोणी का करू शकले नाहीत? बरं, या दुर्गम वगैरे भागांत निवडणुकीच्या वेळी मते मागण्यासाठी सर्वच पक्षांचे लोक चिखल, माती तुडवीत पोहोचतातच ना? तेव्हा कोणतेही अडथळे येत नाहीत याचाही विचार करावा लागेल, असा टोला शिवसेनेनं केंद्र सरकारला लगावला आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांशी मदत आणि सहकार्याबाबत फोन करून चर्चा केली आहे. एनडीआरएफ, लष्कर, हवाई दल यांच्या तुकडय़ा मदत करीत आहेतच. शिवाय भविष्यात पूरपरिस्थितीचे संकट उद्भवू नये यासाठी ज्या दूरगामी उपाययोजना कराव्या लागणार आहेत त्यासाठीही केंद्राची मदत लागणार आहे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे, असेही अग्रलेखात म्हटलं आहे.

महाड, पोलादपूरमध्ये तर जीवनाचा कडेलोटच झाला. तळीये गावावर डोंगर कोसळला. त्यात पन्नासच्या आसपास लोकांनी जीव गमावला. तितकेच लोक बेपत्ता आहेत. साताऱयात विविध ठिकाणी ढिगाऱयांखाली 31 जीव प्राणास मुकले. कोल्हापूर, सांगलीत पूरपरिस्थितीने चिंता निर्माण केली आहे. अर्धे कोकण दरडग्रस्त आणि जमीनदोस्त झाल्याचे चित्र विदारक आहे. महाराष्ट्रातील 15 जिल्हय़ांना महाप्रलयाचा जबरदस्त फटका बसला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, जळगाव, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नगर, अमरावती, भंडारा, रत्नागिरी, रायगड आणि मुंबईतील उद्ध्वस्त झालेली घरेदारे पुन्हा उभी करता येतील, पण असंख्य जीव या तडाख्यात गमावले ते कसे परत आणणार? 

निसर्गाचे रौद्ररूप म्हणजे काय, ते गेल्या चार दिवसांपासून आपण सगळेच पाहत आहोत.  काही भागांवर पावसाने कोप केला आहे. या सर्व संकटांतून बाहेर पडण्यासाठी राज्याला हजारो हातांचे बळ लागेल, असे अग्रलेखात म्हटलं आहे.  राज्य सरकार मदत करीतच आहे, पण मुंबईतील श्रीमंतांनी, ज्यांची ज्यांची पत आणि ऐपत आहे त्यांनी तसेच खास करून आपल्या प्रिय दिल्लीश्वरांनी यावेळी आपल्या दिलदारीचे प्रदर्शन करावे हीच विनंती! असे शिवसेनेनं यात म्हटलं आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com