Sanjay Raut, CM Uddhav Thackeray .jpg
Sanjay Raut, CM Uddhav Thackeray .jpg

ठाकरेंनी करुन दाखवले; देशालाही 'महाराष्ट्र मॉडेल' प्रमाणेच चालावे लागेल!  

युद्धात सेनापती हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लढत नाही. तो वॉररुममध्ये बसून विजय मिळवून देतो.

मुंबई : काही राज्यांनी कोरोना चाचणी केली नाही. अचानक लाटा उसल्यामुळे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथून आकडेवारी यायला लागली आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात कोरोना रुग्णसंख्येचे आकडे निम्म्यावर आले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 24 तास काम करत आहेत. शासन आणि प्रशासनाची सूत्रे आपल्या हातात घेऊन गाव पातळीवर कोरोना संदर्भातील यंत्रणा काम करते आहे, की नाही हे मुख्यमंत्री स्वतः पाहत, असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. 

राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी राज्यासह देशातील कोरोना परिस्थितीवर भाष्य केले. मुंबईसारख्या ठिकाणी लॉकडाउनच्या परिणाम दिसायला लागला आहे. रुग्ण संख्या निम्म्यावरती आली आहे. जर रुग्ण संख्या कमी होत, असेल संक्रमण कमी होत असेल तर काही कठोर निर्बंध सरकारने घातले तर सरकारला पाठिंबा द्यावा लागेल, असेही राऊत म्हणाले. 

आता दिल्ली आणि संपूर्ण देशालाही कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल, युद्धात सेनापती हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लढत नाही. तो वॉररुममध्ये बसून विजय मिळवून देतो. त्याच प्रमाणे उद्धव ठाकरे यांनीही एकाच ठिकाणी बसून अगदी गावपातळीपर्यंत सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत की नाही, हे पाहिले आहे. त्यामुळे कोरोना आटोक्यात आणण्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे. विरोधकांनी आता टीका करणे बंद करावे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहले आहे. या पत्रातील अनेक सूचना उत्तम आहेत. सरकार त्याचा नक्कीच गांभीर्याने विचार करेल, असे राऊत यांनी म्हटले आहे. 

कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील, असा प्रश्न राऊत यांना विचारला असता ते म्हणाले की, गेल्या पाच-दहा वर्षात देश किती पुढे गेला हे माहिती नाही. पण कोरोना संकटामुळे देश 20 वर्षे मागे गेला. देशातील अनेक यंत्रणा कोलमडून पडल्या असून आता अनेकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, जगात मोठ्या प्रमाणात देशाची मानहानी होत, असल्याचे राऊत म्हणाले.

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकार कोरोनाची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप, प्रियंका गांधी यांनी केला होता. त्यावर विचारले असता राऊत म्हणाले, त्या उत्तर प्रदेश राज्याच्या प्रभारी आहेत. उत्तर प्रदेश खूप मोठ राज्य आहे. त्या राज्याची लोकसंख्या खूप आहे. संपूर्ण राज्याची परिस्थिती चिंताजनक आहे, यात राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र येऊन उत्तर प्रदेशला काय मदत करता येईल हे पाहायला पाहिजे. असेही राऊत म्हणाले.  

सध्या राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सचा काळाबाजार होताना दिसत आहे. हा काळाबाजार सरकार करत नाही.  नगरमधील एका नेत्यानेही अशाचप्रकारे इंजेक्शन्स आणली. तो विषय वेगळा आहे. तरीही रेमडेसिव्हिर इंजेक्शन्स ही सरकारच्या माध्यमातूनच गरजू लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com