संजय राऊत म्हणतात...होय आम्ही भेटलो पण! - Shiv Sena MP Sanjay Raut criticizes the Opposition  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

संजय राऊत म्हणतात...होय आम्ही भेटलो पण!

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 4 जुलै 2021

महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते भेटले, तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण काय?

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांची भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, राऊत यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. आमची कोणतीही भेट झालेली नाही आणि जरी भेट झाली असली, तरी त्यात गैर काय? महाराष्ट्राचे राजकारण हिंदुस्थान-पाकिस्तानसारखे नाहीये. पण ज्यांना माझ्यामुळे आणि माझ्या लिहिण्या-बोलण्यामुळे त्रास होतो, अशा लोकांकडून अफवा पसरवल्या जातात, मी त्यांचे स्वागतच करतो'' असा टोला राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे. (Shiv Sena MP Sanjay Raut criticizes the Opposition)  

हेही वाचा :...म्हणून मी गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगड टाकला

राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत यांनी अशी भेट झाली जरी असेल, तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे असा सवाल केला. महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते भेटले, तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण काय? पण मुळात अशा पद्धतीची भेट झालीच नाही. मी कामात होतो. पण तरी अफवा पसरवण्यात आल्या. अशा अफवांमुळे राजकारण हलते का? अस्थिर होते का? अजिबात नाही. राज्याच्या सरकारला काही अडचणी निर्माण होतील का? अजिबात नाही. उलट अशा अफवा पसरवल्यामुळे आमचे तीन पक्षांचे नेते एकत्र येतात. अशा अफवा पसरवण्याचे हे कारखाने एक दिवस दिवाळखोरीत जातील, अशा शब्दात राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

हेही वाचा : भापजची खेळी फेल करण्यासाठी ठाकरे सरकारचा हा प्लॅन

राऊत म्हणाले, खूप आधी आशिष शेलार एका सार्वजनिक कार्यक्रमात भेटले होते. तेव्हा आम्ही कॉफी प्यायलो होतो. महाराष्ट्रातले राजकारण हिंदुस्तान-पाकिस्तानसारखे नाही की गोळ्या घाला अन् संपवा. या प्रकारे अफवा पसरवल्यामुळे काहीही होणार नाही. विधानसभेचे अधिवेशन सुरू होतेय. त्याआधी अफवा पसरवल्या जात आहेत.

महाराष्ट्रच्या हिताचे अनेक विषय आहेत. त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. काही निर्णय होणे गरजेचे आहे, कायदे मंजूर होणे गरजेचे आहे. विरोधी पक्षांनी दोन दिवस विधिमंडळाचे कामकाज चालू दिले पाहिजे. जर विरोधी पक्षांना महाराष्ट्राची चिंता असेल आणि स्वत:ला महाराष्ट्राचे समजत असतील. तर त्यांनी दोन दिवस पूर्णवेळ अधिवेशन चालू द्यावे. अधिवेशनात गोंधळ म्हणजे रणनीती नाही. अधिवेशन चालू न देणे याला रणनीती म्हणत नाही. दोन दिवसांचे अधिवेशन जेव्हा होतात, तेव्हा ते गोंधळात वाहू देऊ नये अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे, असेही राऊत यांनी सांगितले.   

Edited By - Amol Jaybhaye   

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख