महाराष्ट्रातही पेगॅससचा 100 टक्के वापर; संजय राऊत यांचा धक्कादायक आरोप  - Shiv Sena MP Sanjay Raut criticizes the central government | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्रातही पेगॅससचा 100 टक्के वापर; संजय राऊत यांचा धक्कादायक आरोप 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 20 जुलै 2021

या देशात कुणी सुरक्षित नाही, आमचे फोन सगळे ऐक्यतात असे नागरिकांना वाटते, आमच्यावर पाळत ठेवली आहे

मुंबई : पेगॅसस हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे काही महत्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने देशात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी, माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अन्य एक मंत्री, प्रशांत किशोर, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा आदींनाही 'पेगॅस' सद्वारे लक्ष्य करण्यात आल्याची शक्यता वर्तवन्यात आली आहे. संसदेशा अधिवेशनात हा विषय चांगलाच तापला असून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातही पेगॅससच्या वापराबाबत वक्तव्य केले. (Shiv Sena MP Sanjay Raut criticizes the central government) 

हेही वाचा : मी तोंड उघडल्यास महागात पडेल! के. सी. पाडवींचा फडणवीसांना इशारा

संजय राऊत म्हणाले, या देशात कुणी सुरक्षित नाही, आमचे फोन सगळे ऐक्यतात असे नागरिकांना वाटते, आमच्यावर पाळत ठेवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समोर यावे आणि उत्तर द्यावे, अशी मागणी राऊत यांनी केली. अशोक लवासा आणि अश्विनी वैष्णव मंत्री नसताना त्यांच्यावर पाळत ठेवली जाते. जे आता माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री आहेत, मग त्यांच्यावर खासदार असताना पाळत का ठेवली, असा सवाल राऊत यांनी केला आहे.  

मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षाची बैठक बोलावली आहे. संसदेमध्ये शिवसेना प्रोटेस्ट करणार, असल्याचे राऊत यांनी सांगितले. भाजप जर विरोधीपक्षत असता तर सरकारचा असाच निषेध केला असतात, असेही ते म्हणले. फोन टँपिंग, चोऱ्या-माऱ्या करने बंद करा.  

हेही वाचा : सरकार पडेल असे रोज सकाळी वाटतं पण संध्याकाळ होईपर्यंत टिकतं!

महाराष्ट्रात पेगॅससचा वापर झालेला असू शकतो का असे विचारले असता राऊत म्हणाले ''१०० टक्के याचा वापर झालेला आहे. महाराष्ट्रात अशी तंत्रज्ञान आणि यंत्रणा आम्हाला रोखण्यासाठी वापरली गेली आजही वापरली जात असावी. हे फार मोठे षडयंत्र आहे. सरकारी मदतीशिवाय अशा प्रकारचे धाडस आणि हिम्मत कोणी करु शकत नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख