सरकार बनले, दुपारी कोसळले ; त्या ऑपरेशनचे अजित पवार सर्जन आहेत - Shiv Sena MP Sanjay Raut criticizes BJP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

सरकार बनले, दुपारी कोसळले ; त्या ऑपरेशनचे अजित पवार सर्जन आहेत

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

 राज्यात सत्ताबदल होणार हे नक्की असून तो कसा होणार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) माहिती आहे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी म्हटले होते.

मुंबई : राज्यात सत्ताबदल होणार हे नक्की असून तो कसा होणार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) माहिती आहे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी म्हटले होते. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला ते म्हणाले, ''अजित पवार यांना चांगले माहिती आहे सरकारला कसा टेकू लावायचा. ज्यावेळी पहाटे सरकार बनले, दुपारी कोसळले, त्यानंतर पुन्हा ते बनले…या ऑपरेशनचे अजित पवार सर्जन आहेत'', असा टोला राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

पंकजा मुंडेंचे आरोग्यमंत्र्यांना पत्र...धनंजय मुंडेवर निशाणा...

राऊत यांनी आज मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले, बेळगाव दौरा हा फक्त दौरा नव्हता. महाराष्ट्र एकीकरण समिती फार महत्त्वाची संघटना आहे. एकीकरण समितीचा उमेदवार शुभम शेळके हा लोकसभा लढवत आहे आणि त्याला पाठिंबा देणे हे महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाचे कर्तव्य, असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

केंद्र सरकारमुळे गरजूंना डाळ वाटपात विलंब 

इथे मतभेद असले तरी चालतील मात्र तिथे असायला नकोत. प्रत्येक मराठी माणसाने तिथे गेले पाहिजे. तिथे लोकांचा उत्स्फुर्तपणे पाठिंबा मिळतोय. यावेळेस महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेकळे चांगली मुसंडी मारतील, असा अंदाज राऊत यांनी व्यक्त केला. 'सीमाभागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देणे हे राज्यातील प्रत्येक पक्षाचे कर्तव्य आहे. आम्ही सर्वांना आवाहन केले होते बेळगावात येऊन मराठी माणसाला पाठिंबा द्या, असे राऊत म्हणाले.

बेळगावसाठी १९६७ साठी आंदोलन करून शिवसेनेने ६७ हुतात्मे दिलेले आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांना तीन वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला होता. त्या शिवसेनेचे आम्ही पाईक आहोत, त्यामुळे आमचे मराठी प्रेम काय आहे हे आम्हाला इतरांकडून शिकण्याची गरज नाही, असे राऊत म्हणाले.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख