सरनाईक कुठे आहात ?..सोमय्यांच्या टि्वटनंतर सरनाईकांच्या रिसॉर्टवर ED आणि CBIचा छापा - Shiv Sena MLA Pratap Saranaik resort in Lonavla raided, ED and CBI take joint action | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

सरनाईक कुठे आहात ?..सोमय्यांच्या टि्वटनंतर सरनाईकांच्या रिसॉर्टवर ED आणि CBIचा छापा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 मे 2021

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू आहे

पुणे :  शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील एका रिसॉर्टवर ईडी ED आणि सीबीआयकडून CBIछापा टाकण्यात आला आहे.  गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ईडीने प्रताप सरनाईक Pratap Saranaik यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग यांचीही चौकशीही केली होती. Shiv Sena MLA Pratap Saranaik resort in Lonavla raided, ED and CBI take joint action

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक गायब असल्याचं एक ट्वीट केलं होतं. त्यानुसार सरनाईक यांना ताब्यात घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. प्रताप सरनाईक यांच्या अडचणी आता आणखी वाढणार असल्याची चिन्ह आहेत. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू आहे. हे प्रकरण थंडावले होते, पण सोमय्यांच्या टि्वटनंतर ही कारवाई होत असल्याचे समजते. आज सकाळीच ईडी आणि सीबीआयचे अधिकारी लोणावळा येथील रिसॉर्टवर पोहोचले. याठिकाणी कसून तपास सुरु आहे. 

टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने 25 नोव्हेंबरला अमित चांदोळे यांची चौकशी केली होती.  चांदोळे यांना अटकही केली होती.  चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार होते. टॉप्स ग्रुपकडून एमएमआरडीएला 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच देण्यात आली होती. टॉप्स सिक्युरिटीचे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी 28 ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती.  त्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता.

राहुल नंदा यांच्या टॉप्स सिक्युरिटीकडून 100 पैकी फक्त 70 टक्के गार्ड्स वापरले जायचे. 30 टक्के गार्ड्सचा वापर केला जात नव्हता. म्हणजेच जवळपास 150च्या आसपास गार्ड्स वापरले जात नव्हते. मात्र त्याची रक्कम सगळी टॉप्सच्या ग्रुपला मिळत होती. त्यातील काही रक्कम लाच म्हणून अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत होती. यापैकी काही वाटा प्रताप सरनाईक यांना मिळत असल्याचा संशय ईडीला आहे.
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख