स्वतः जेसीबी चालवत शिवसेनेच्या आमदारांनी केली अतिक्रमणांवर कारवाई  - Shiv Sena MLA Dilip Lande took action on encroachments | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

स्वतः जेसीबी चालवत शिवसेनेच्या आमदारांनी केली अतिक्रमणांवर कारवाई 

जयश्री मोरे
बुधवार, 2 जून 2021

शिवसैनिक भगवे झेंडे , फलक घेऊन अतिक्रमण कारवाईसाठी दाखल झाले होते.

अंधेरी  : पंधरा वर्षे  रुंदीकरणच्या प्रतिक्षेत असलेल्या अंधेरी कुर्ला रोडचे साकीनाका बाजूच्या रुंदीकरण्याच्या कामाचा पहिला टप्पा आज सुरु झाला.  या वेळी स्थानिक आमदार दिलीप लांडे Dilip Lande यांच्यासह शिवसैनिक  शक्तीप्रदर्शन करीत भगवे झेंडे , फलक घेऊन अतिक्रमण कारवाईसाठी दाखल झाले होते. Shiv Sena MLA Dilip Lande took action on encroachments

या रुंदीकरण मध्ये सर्वात मोठा अडथळा हा येथील दुकानांच्या पुनर्वसन आणि परिसरातील अतिक्रमणांचा होता. मात्र, गेल्या वर्षभरात पालिकेने अगदी झपाट्याने हा विषय मार्गी लावला. टप्प्या टप्प्यात कारवाई केल्यामुळे हा रस्ता बनविण्यात येत आहे.  साकीनाका वरून कुर्लाकडे जाताना एक मार्ग हा विमानतळाकडे देखील जात असल्याने इथे मोठ्या वाहतुक कोंडीला वाहन चालकाना सामोरे जावे लागत होते. मात्र, आजच्या अतिक्रमण कारवाईमुळे रस्ता रुंदीकरणाच्या कामास सुरवात झाली.  आता एयरपोर्टकडे जाणाऱ्या रस्तापर्यंत रस्तारुंद होत आहे. 

या साकीनाका जंक्शन जवळील अतिक्रमक कारवाईमध्ये स्वतः आमदार दिलीप लांडे यांनी जेसीबी चालवत अतिक्रमण कारवाईला सुरुवात केली पाहिजे. पुढील काही महिन्यात आता कुर्ला बाजूने देखील अतिक्रमण कारवाई करुन रस्ता रुंदीकरणाचे काम लवकरच होईल, असे या वेळी आमदार लांडे म्हणाले. 

''मायबाप सरकार, मंदिरं उघडा नाही तर आमच्यावर बॉम्ब टाका..''  
 
शेगाव (बुलढाणा) : लॅाकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून सर्व मंदिरं बंद आहेत. त्यामुळे मंदिराच्या बाहेर आपलं पोट भरणारे आता अडचणीत सापडले आहेत, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. छोटा मोठा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे आता लॉकडाऊनमुळे अडचणीत आले आहेत. अशाच एका मंदिराच्या बाहेर हळदी कुंकू विक्री करणाऱ्या आज्जीबाईंच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांनी ''आता मंदिर उघडत नसाल तर सरकारने आमच्यासारख्या गरिबांवर एखादा बॉम्ब गोळा टाकून आम्हाला मारा, किंवा आम्हा विष पाजा,'' अशी  प्रतिक्रिया दिली.  

लोकडाऊनमुळे राज्यातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे मंदिरांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालंय. मात्र, मंदिरासमोर बसून विविध व्यवसाय करून आपली उपजीविका करणाऱ्याचे ही मोठं नुकसान झालंय.. त्यामुळे जगावं कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.  बुलडाणा जिल्ह्यातील शेगांवचे गजानन महाराज मंदिर सध्या लोकडाऊन मुळे बंद आहे.  तर याठिकाणी मंदिराच्या बाहेर आपली छोटीमोठी दुकाने थाटून असणाऱ्या आणि त्यावर आपला घरसंसार चालवणाऱ्या फुल विक्रेता, मिठाई विक्रेता, खेळणी विकणारे, हॉटेल व्यावसायिक, भिकारी इतर व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. 
Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख