राजकारणासाठी उभा जन्म आहे...आता जीव महत्वाचा...राऊतांनी विरोधकांना फटकारले... - Shiv Sena leader Sanjay Raut criticizes BJP  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

राजकारणासाठी उभा जन्म आहे...आता जीव महत्वाचा...राऊतांनी विरोधकांना फटकारले...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 एप्रिल 2021

मुंबईत विरोधी पक्षाला लॅाकडाउन नको होता, पण लोकांचा जीव महत्त्वाचा आहे,'' असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. 

मुंबई : ''कोरोनाचे संकट हे राष्ट्रीय संकट आहे. ही मेडिकल  इमर्जन्सी आहे. कोरोनाच्या संदर्भात कोणीही राजकारण करू नये.  लॅाकडाउन का कशासाठी, हे प्रश्न चुकीचे आहेत.  काल गुजरातमध्ये लॅाकडाउन करा, असे न्यायालयाने सांगितले आहे. पण मुंबईत विरोधी पक्षाला लॅाकडाउन नको होता, पण लोकांचा जीव महत्त्वाचा आहे,'' असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत राऊत म्हणाले, ''अनिल देशमुख यांचा मुद्दा न्यायालयात आहे. त्यामुळे मी याबाबत कोणतेही भाष्य करणार नाही.  अनिल देशमुख हे सुप्रीम कोर्टाकडे गेले आहेत. आता न्यायालयच याबाबतच निर्णय देईल. अनिल देशमुख आता सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहेत, त्यामुळे त्याच्यावर मत व्यक्त करणे योग्य नाही. नियम, कायदे आणि भूमिका या न्यायालयाच्या सर्वांसाठी समान असायला हव्यात,''

राऊत म्हणाले की, एकमेकांना सहकार्य करून नागरिकांचे विषय मार्गी लावायला हवेत. यावर राजकारण करू नये, देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा आहे. पुढचे काही महिने विरोधी पक्षाने महाराष्ट्राचे सरकारच्या हातात हात घालून कोरोनाच्या विरोधातली लढाई लढली पाहिजे राजकारण करण्यासाठी उभा जन्म आहे.

''महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाची भूमिका अचानक बदलली आहे. गुजरातमध्ये हायकोर्ट सांगते की लॅाकडाउन करा, त्यामुळे कुठलेही सरकार आनंदाने लॅाकडाउन करीत नाही, ही एक आपत्कालीन परिस्थिती आहे. त्यामुळे आम्हाला लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागला आहे,'' असे राऊत यांनी सांगितले. 

हेही वाचा : राजीनामा देण्याची जबाबदारी फक्त शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांवर ?...शिवसेनेचा सवाल

मुंबई : ''महाराष्ट्रात कुठे काही सळसळ झाली तरी सीबीआय, ईडी, राष्ट्रीय तपास यंत्रणेला घुसवायची संधी शोधायची हे राज्यातील विरोधी पक्षाचे आद्य कर्तव्यच झाले आहे. राज्याची सत्ता त्यांना हवी आहे व त्यासाठी सध्या आहे ती घडी उलथवायची आहे. त्यासाठी कोणत्याही थराला जायची विरोधकांची तयारी असेलही, पण ते जमेल असे दिसत नाही, '' अशी टीका विरोधी पक्षावर शिवसेनेने टीका केली आहे.  

यापूर्वीही महाराष्ट्रात विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर आरोप करून धुरळा उडवला आहे. अनेकदा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना जावे लागले आहे, पण त्यांच्यात आजच्या विरोधी पक्षांप्रमाणे द्वेष आणि विखार भरलेला नव्हता. विरोधी पक्षाच्या हातात खरोखरच काहीतरी पुरावे होते म्हणून हल्ले केले. आज साबणाचे बुडबुडे सोडून ‘बॉम्ब बॉम्ब’अशी भीती निर्माण केली जात आहे, असा टोला 'सामना'च्या अग्रलेखात भाजपला लगावला आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख