शिवसेना उड्या मारायला लागलीय, इतक्‍या लवकर डीजे नका वाजवू, निलेश राणेंचा सल्ला 

सुशांतप्रकरणात सीबीआय पाठोपाठ एनसीबीही आली. या दोन्ही संस्थांनी आपल्या पद्धतीने तपास केला आहे.
शिवसेना उड्या मारायला लागलीय, इतक्‍या लवकर डीजे नका वाजवू, निलेश राणेंचा सल्ला 

मुंबई : अभिनेता सुशांत राजपूतप्रकरणी एम्सने दिलेल्या अहवालानंतर शिवसेना उड्या मारायला लागली आहे. अजून खूप काय बाकी आहे एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका असा सल्ला भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला दिला आहे. 

सुशांतप्रकरणात सीबीआय पाठोपाठ एनसीबीही आली. या दोन्ही संस्थांनी आपल्या पद्धतीने तपास केला आहे. मात्र सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली हा महत्त्वाचा प्रश्‍न होता. एम्सचे डॉक्‍टर कोणता निर्णय देतात याकडे बिहारसह देशाचे लक्ष लागले होते. शेवटी एम्सने सुशांतने आत्महत्याच केल्याचा अहवाल दिला. अधिकृतरित्या हा अहवाल आल्याने शिवसेना अधिकच आक्रमक झाली आहे. या पक्षाच्या नेत्यांनी विशेषत: कंगना राणावत हिच्यावर सडकून टीका करण्यास सुरवात केली आहे. तसेच भाजपचे नाव न घेता त्यांनाही ओरखडे ओढले आहेत. 

शिवसेना नेत्यांच्या ज्या प्रकारे प्रतिक्रिया येत आहे त्याकडे लक्ष वेधत निलेश राणे यांनी ट्‌विट करून या पक्षाच्या नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. राणे यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की सुशांतप्रकरणात एम्सने जो अहवाल दिला आहे. त्यानंतर शिवसेना उड्या मारायला लागली, त्यांना वाटतं की केसचा निकाल लागला. बॉडी नसल्यामुळे फक्त उरल्यासुरल्या गोष्टींवर अहवाल द्यावा लागला. सीबीआयचा रिपोर्ट अजून बाकी आहे. अजून खूप काय बाकी आहे एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका. 

आता निलेश राणे यांनी दिेलेल्या सल्ल्यावर शिवसेनेकडून कोणती प्रतिक्रिया येते की त्यांच्याकडे सल्ल्याकडे शिवसेना दुर्लक्ष करते हे पाहावे लागेल. 

हे ही वाचा 

जे छाती बडवत होते, एम्स'ने त्यांच्या मुस्काटात"मारली ! 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात जे छाती बडवत होते, त्यांच्या मुस्काटात "एम्स'ने मारली आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली आहे. 

सुशांतप्रकरणानंतर बॉलिवूडविषयी अनेक प्रश्‍न उपस्थित केले गेले. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणही पुढे आले. स्वत: सुशांत ड्रग्जचे सेवन करीत असल्याचे त्याच्या जवळच्या मित्रांचे म्हणणे आहे. मात्र त्याने आत्महत्या नव्हे तर त्याची हत्याच झाली असे खळबळजनक आरोपही करण्यात आले. मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्‍नचिन्ह करण्यात आले त्यामध्ये बिहारचे निवृत्त डीजीपी गुप्तेश्‍वर पांडे, अभिनेत्री कंगना राणावत यांचाही समावेश होता. आरोप करण्यात हे दोघे आघाडीवर होते. 

आता अनिल परब यांनीही सुशांतप्रकरणात मुंबईला बदनाम करणाऱ्या आणि त्याची हत्याच झाली म्हणणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. परब यांनी म्हटले आहे, की बिहार निवडणुकीत राजपूत मतं मिळतील यासाठी हे सर्व सुरू होत, मात्र हा प्रयत्न फसला आहे. शिवसेना आणि आमच्या युवा नेत्यांला बदनाम केलं याची भरपाई कोण करणार ? अब्रू नुकसान कसं भरून काढायचं ते शिवसेनेला चांगलं माहीत आहे 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com