भाजपने लॅाकडाउन विरोधात तांडव केलं तर त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागतील... - Shiv Sena criticizes BJP over lockdown Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपने लॅाकडाउन विरोधात तांडव केलं तर त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागतील...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 एप्रिल 2021

'कोरोना आम्हाला स्पर्शही करणार नाही' या फाजील आत्मविश्वासाच्या मानसिकतेतून कोरोना वाढतच गेला.

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्येची आकडेवाढी दिवसेंदिवस वाढतच जात आहे. लॅाकडाउनची शक्यता उद्या होणार का, याबाबत नागरिकांच्या मनात प्रश्न आहे. नागरिकांच्या बेजाबदारपणामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे राज्यात लॅाकडाउन होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी लॅाकडाउन करु नये, अशी भूमिका घेतली आहे. विरोधकांच्या या भूमिकेला सामनाच्या अग्रलेखातून उत्तर देण्यात आले आहे.  

एकमेकांना सहकार्य करून राज्यातील लोकांचे प्राण वाचविण्यासाठी हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे. कोरोना कुणालाही सोडत नाही. लोकांनी बेदरकारपणा थांबवला नाही तर सरकारला कडक पावले उचलण्याशिवाय पर्याय राहणार नाही. सरकारने कडक पावले उचलली तर विरोधी पक्ष तांडव करणार. विरोधी पक्षाने तांडव केले तर त्याचे दुष्परिणाम जनतेलाच भोगावे लागणार. त्यामुळे ‘लॉक डाऊन’, ‘टाळेबंदी’ नको असेल तर जनतेने बेदरकारपणे जगणे तूर्त सोडावे. कामधंदा, रोजगार, शिक्षण, नाटक, सिनेमा, पर्यटनाचा आनंद सगळय़ांनाच हवा आहे, पण हे सर्व कधी शक्य आहे? जोपर्यंत कुडीत प्राण आहे तोपर्यंत. आधी जीव वाचवा इतकेच आम्ही सांगू शकतो, असे अग्रलेखात म्हटलं आहे. 

 काळ फालतू राजकारण करण्याचा नाही
याक्षणी देशात केविड रुग्णांची संख्या दीड कोटीच्या आकडय़ात पोहोचली आहे. देशातील दहा जिल्हे सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. या दहातील आठ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, नांदेड, नगर या शहरांनी कोरोनात आघाडी घेतली आहे. राज्यात सर्वाधिक मृत्यू नागपुरात होत आहेत. मंगळवारी एकटय़ा नागपुरात 54 रुग्णांनी आपला जीव गमावला. त्यामुळे विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस यांनी नागपूर महापालिका व शहराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही. एकमेकांना सहकार्य करून राज्यातील लोकांचे प्राण वाचविण्यासाठी हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे, असा सल्ला शिवसेनेने फडणवीसांना दिला आहे.
 
कडक पावले उचलण्याशिवाय पर्याय नाही.

लोकांनी बेदरकारपणा थांबवला नाही तर सरकारला कडक पावले उचलण्याशिवाय पर्याय राहणार नाही. सरकारने कडक पावले उचलली तर विरोधी पक्ष तांडव करणार. विरोधी पक्षाने तांडव केले तर त्याचे दुष्परिणाम जनतेलाच भोगावे लागणार. जनतेने बेदरकारपणे जगणे तूर्त सोडावे. कामधंदा, रोजगार, शिक्षण, नाटक, पर्यटनाचा आनंद सगळय़ांनाच हवा आहे, पण हे सर्व कधी शक्य आहे? जोपर्यंत कुडीत प्राण आहे तोपर्यंत. आधी जीव वाचवा इतकेच आम्ही सांगू शकतो.
 
आम्हाला काय कुणाची भीती? 
सार्वजनिक ठिकाणी गर्दी सुरू केली. त्यात मास्क लावायचा नाही, सोशल डिस्टन्सिंग पाळायचे नाही. ग्रामीण भागात तर जे लग्न समारंभ साजरे केले गेले त्यात हजारोंची गर्दी करून लोकांनी कोरोनासाठी पुन्हा पायघडय़ाच घातल्या. ‘आम्हाला काय कुणाची भीती? कोरोना आम्हाला स्पर्शही करणार नाही’ या फाजील आत्मविश्वासाच्या मानसिकतेतून कोरोना वाढतच गेला.  पुन्हा कोरोनासंदर्भात सबुरीचे सल्ले देणारे या बेफिकीर मंडळींना दुश्मन वाटू लागतात. रुग्ण संख्या वाढू लागल्याने सरकारने खासगी रुग्णालये ताब्यात घेतली आहेत. लसीकरण वाढवले आहे. महाराष्ट्रात लॉक डाऊन नसला तरी रात्रीचे निर्बंध अधिक कडक केले आहेत. हे निर्बंधदेखील पाळायला लोक तयार नसतील तर सरकारला कठोर उपाययोजना कराव्याच लागतील. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख