जन आशीर्वाद जत्रेतले अर्धे मंत्री उपरे, बाटगे आहेत ; शिवसेनेचा 'प्रहार' 

राणे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यावर केलेल्या आरोपांवर शिवसेनेने कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचा पवित्रा घेतला आहे.
Sanjay Raut.jpg
Sanjay Raut.jpg

मुंबई : भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेकडे शिवसेनेचा कानाडोळा केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांनी शिवसेनेच्या मंत्र्यावर केलेल्या आरोपांवर शिवसेनेने कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचा पावित्रा घेतला आहे. शिवसेनेचे मुख्यपत्र 'सामना'तून त्यांचे नाव घेता. त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्यावर उपरे आणि बाटगे या शब्दात टीका केली आहे. 
 
'2024 चे लक्ष्य' वगैरे ठीक आहे, पण मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे काही प्रयोग विरोधकांनाही करावेच लागतील. 'मोदी नामा'ची  Narendra Modi जादू उतरली आहे. त्यामुळे 2024 चा जय-पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल. त्याची तयारी, रंगीत तालीम करावी लागेल, नाहीतर जन आशीर्वादाच्या 'जत्रा' लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील! विरोधी पक्षांची एक मोट बांधून 2024 च्या निवडणुकांना सामोरे जावे, असे विचार सुरू झाले आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने देशातील विरोधी पक्षांची एक बैठक पार पडली. काँग्रेससह 19 राजकीय पक्ष या बैठकीत सामील झाले. 19 पक्ष एकत्र आले व त्यांनी विरोधी पक्षांची 'मोट' बांधण्यासंदर्भात चर्चा केली. त्या चर्चेतून कोणते फळ हाती लागले हे महत्त्वाचे, असे अग्रलेखात म्हटलं आहे. 

''लोकशाही आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच, पण फक्त 'चर्चा पे चर्चा' नकोत तर देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचे आहे. मोदी सरकारने सध्या त्यांच्या मंत्र्यांची एक जन आशीर्वाद 'जत्रा' सुरू केली आहे. त्या जत्रेत फक्त विरोधकांविरोधात शिव्याशाप देण्याचेच काम सुरू आहे. या जन आशीर्वाद जत्रेतले अर्धे मंत्री हे विचार व आचाराने उपरे किंवा बाटगे आहेत. म्हणजे काल-परवा भाजपात घुसले व मंत्रीपदाची हळद लावून बोहल्यावर चढले. हे उपरे भाजपचा प्रचार करीत फिरत आहेत व वर्षानुवर्षे भाजपच्या पालख्या उचलणारे कार्यकर्ते त्या 'जत्रे'त येडय़ाखुळय़ासारखे सामील झाले आहेत, अशी एक गंमत महाराष्ट्रासह देशभरात सुरू असताना विरोधी पक्षांना अधिक विचाराने पावले टाकावी लागतील.विरोधकांच्या एकजुटीचे प्रदर्शन करताना त्याची तटबंदी ढिसाळ पायावर असता कामा नये,'' असा सल्ला शिवसेनेने दिला आहे. 

  • ममता बॅनर्जी यांना जेरीस आणण्यासाठी केंद्र सरकार सीबीआय, न्यायालये व इतर सर्व यंत्रणांचा वापर आजही करीत आहेत
  • बंगालात मोदी-शहांना जंतर मंतर करता आले नाही तसे दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात राजभवनाची प्रतिष्ठा पणास लावूनही सरकार स्थापन करता आले नाही. 
  • तीन पक्षांचे सरकार महाराष्ट्रात उत्तम सुरू आहे. प. बंगाल व महाराष्ट्रात जे घडले ते विरोधी पक्षाला मार्गदर्शक आहे.  
  • प्रादेशिक पक्ष जोरात आहेत. ओडिशा, आंध्र प्रदेशातील सरकारे ही दिल्लीत 'ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी' या महान विचारांची आहेत.
  • महागाई-बेरोजगारी आहे. पेगॅससचे गांभीर्य सरकार समजून घेत नाही, लोकांची मने तापवून भावनांचे खेळ करायचे. 
  • 'मोदी नामा'ची जादू उतरली आहे. त्यामुळे 2024 चा जय-पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल. 
     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com