फडणवीस-पाटील यांच्या गळ्यात राणे नावाचा फाटका फुगा अडकला 
Sanjay Raut.jpg

फडणवीस-पाटील यांच्या गळ्यात राणे नावाचा फाटका फुगा अडकला 

शिवसेनेने भाजपला खडे बोल सुनावले आहेत.

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांना काल पोलिसांनी अटक केली, रात्री उशीरा त्यांना जामीन मंजूर झाला. काल भाजप-शिवसेना यांच्यात राडा झाला. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून भाजपवर निशाणा साधला आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपला खडे बोल सुनावले आहेत. 

केंद्रीय मंत्रिपदाची झूल पांघरूनही मूळ स्वभाव काही जाईना. आता भाजप नक्की काय करणार? की या वेळीही बगला वर करुन नामानिराळे राहणार? महाराष्ट्राची सत्ता हातून निसटल्यापासून भाजपवाल्यांची डोकी कामातून गेली आहेत. त्यांचे आकांडतांडव सुरूच आहे. त्या आकांडतांडवाकडे जनता लक्ष देत नसल्यामुळे ‘महात्मा’ नारोबांसारखे भाडोत्री लोक शिवसेनेवर सोडले जात आहेत. या भाडोत्रींनी भाजपलाच नागडे करून सोडले व आता तोंड लपवून फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, अशी टीकe अग्रलेखातून करण्यात आली आहे. 
अखेर नारायण राणे यांचा जामीन मंजूर
राणे यांनी महाराष्ट्राला लाथ मारली व त्यांचे नवे नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील राणेंच्या बेताल वक्तव्याचे Narayan Rane controversy समर्थन करीत आहेत. राणे यांना तसे बोलायचे नव्हते, अशी मखलाशी करु लागले आहेत. फडणवीस-पाटील यांच्या गळ्यात राणे नावाचा फाटका फुगा अडकला आहे. त्यामुळे सांगता येत नाही, सहनही होत नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे,असा टोमणा शिवसेनेने भाजपला लगावला आहे.

काय म्हटल आहे 'सामना'च्या अग्रलेखात 

  • नको त्या माणसाला सत्तेची दारु पाजल्याने कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागते त्याचा अनुभव भाजप सध्या घेत आहे. 
  • महाराष्ट्राची सत्ता हातून निसटल्यापासून भाजपवाल्यांची डोकी कामातून गेली आहेत. 
  • ‘नॉर्मल’ नसलेल्या राणेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ‘मारहाण’ करण्याची बेलगाम भाषा केली आहे. 
  • महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी ही भाषा वापरणे म्हणजे 105 हुतात्म्यांच्या भावनांना लाथ मारण्यासारखेच आहे.
  • शरद पवार यांच्यासारख्या लोकमान्य नेत्यांवर खालच्या भाषेत टीका करणारे लोकही भाजपने उधारीवर घेतले आहेत.
  • एका माकडाच्या हाती दारूची बाटली होतीच. आता दुसरे माकडही बाटली घेऊन उड्या मारीत आहे. 

 Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.