शिवसेना स्वतःच्याच ओझ्याने कोलमडणार!  

शिवसेनेला सत्तेची उब आवडत असल्याने सत्तारुपी सोन्याचा खुला सुरक्षित पिंजराही सेनेला कधीच सोडता येत नाही.
  Shital Desai .jpg
Shital Desai .jpg

मुंबई : पाच वर्षांपूर्वी युतीच्या सरकारमध्ये शिवसेना (ShivSena) गुलाम होती. सत्तेत असूनही आमचा कोंडमारा होत होता, भाजपने शिवसेनेला दुय्यम दर्जा देऊन सत्तेच्या माध्यमातून शिवसेनेला संपविण्याचे प्रयत्न केले, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) जळगाव येथे म्हणाले होते. शिवसेनेला सत्तेची उब आवडत असल्याने सत्तारुपी सोन्याचा खुला सुरक्षित पिंजराही सेनेला कधीच सोडता येत नाही, असा टोला भाजप महिला मोर्चाच्या मुंबई प्रमुख शीतल गंभीर देसाई (Shital Desai) यांनी राऊत यांना लगावला आहे. (Shital Desai criticism of ShivSena)

भाजपच्या राज्यात सहकारी पक्षांना गुलामी केव्हाही नसते, युतीच्या राज्यात कोणालाही गुलामी करावी लागत नव्हती, उलट सत्तेचा तो सोन्याचा सुरक्षित पिंजरा सोडण्याचे स्वातंत्र्य शिवसेनेला केव्हाही होते. पण सत्तेविना कासावीस झालेल्या त्या पक्षाने त्या सोनेरी सुरक्षित खुल्या पिंजऱ्यात स्वतःच्या मर्जीने आनंदाने प्रवेश केला होता. सत्तेत असताना गुलामीबद्दल चकार शब्दही न काढणे व आता दुसऱ्याच्या पाठीवर टीका करणे हीच सेनेची संस्कृती आहे, अशा शब्दात देसाई यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.

शिवसेनेला संपविण्यासाठी भाजपलाच काय, पण कोणालाही काहीही विशेष प्रयत्न करण्याची गरज नाही. भ्रष्टाचाराबद्दल व लोकहिताकडे दुर्लक्ष करण्याबद्दल प्रसिद्ध असलेली शिवसेना स्वतःच्याच ओझ्याने कोलमडणार आहे. एकीकडे भाजपच्या जागा सतत वाढत असताना शिवसेनेची अधोगती होत आहे. 1995 मध्ये स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे शिवसेनेला जेवढ्या जागा (73) मिळाल्या होत्या तेवढ्या जागा त्यांना नंतर कधीही मिळाल्या नाहीत.

नंतर त्यांच्या जागा कमीच होत गेल्या. मोदीलाटेत आणि काँग्रेसविरोधी वातावरणात 2014 मध्ये व 2019 मध्ये भाजपच्या साथीनेही त्यांना ती कामगिरी परत करता आली नाही. सेनेची वाढ खुंटली असून ती आता आक्रसत चालली आहे. अशा पक्षाने दुसऱ्यांना दूषणे दिल्याने त्यांचा काहीही फायदा होणार नाही. त्यांनी आधी स्वतःच्या डोळ्यातील मुसळ पहावे आणि मग दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ शोधावे, असेही देसाई म्हणाल्या आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com