आनंद शिंदे म्हणतात...संविधानातील तरतुदीमुळे राज्यपाल सुरक्षीत; अन्यथा...

विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आनंद शिंदे यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याची चर्चा आहे.
  Anand Shinde .jpg
Anand Shinde .jpg

मुंबई : विधानपरिषदेच्या 12 जागांवरील राज्यपाल नामनियुक्त सदस्यांचा प्रश्न सध्या गाजतोय. याच मुद्यावर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी या मुद्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Anand Shinde said about Governor Bhagat Singh Koshyari)  

विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आनंद शिंदे यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याची चर्चा आहे. शिंदे म्हणाले, राज्यपाल संविधानाचा विचार नक्की करतील. राज्यपाल पण चांगलेच आहेत. त्यांनी पण संविधाव वाचलेले असेल. संविधानात तरतूद आहे, त्यामुळे राज्यपाल सुरक्षित आहेत. अन्यथा त्यांच्यावर समाजाचा दबाव आला असता, असे शिंदे म्हणाले.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने कायदा मोडू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही लोकांचा प्रवेश झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांना विनंती केली, असल्याची माहिती दिली. त्यामुळे बारा आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न लवकरच सुटेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.  
 
दरम्यान, शिसेना खासदार संजय राऊत यांनीही या मुद्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, भेटीनंतर राज्यपालांनी त्यांचा निर्णय कृतीतून दाखवला. हसरे फोटो प्रसिद्ध झाल्याने वातावरण प्रसन्न होते. त्यामुळे लवकरच राज्यपाल १२ आमदारांचा निर्णय निकाली लावतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. राज्यपालांवर राजकीय दबाव असेल तर त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. भेटीनंतर राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असल्याचे राऊत यांनी सांगितले होते. 

राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष कधीही झाला नाही. तो यानिमित्ताने का होतोय याचा विचार झाला पाहिजे. मंत्रिमंडळाने दिलेल्या नावांना राज्यपालांनी मंजुरी देणे हे त्यांचे काम आहे. जी 12 नाव मंत्रिमंडळाने दिली ती काय तालिबान कडून प्रशिक्षण घेऊन आलेले नाही किंवा गुंडही नाहीत. यामध्ये साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील नाव आहेत. त्यामुळे राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा. असे राऊत म्हणाले. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. महाराष्ट्रा पुढे खूप मोठी कामे आहे. देशात पहिल्या पाच मध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव आहे हे विरोधी पक्षातील नेत्यांचे दुःख मी समजू शकतो, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. शिवसेनचा इतिहास सर्वांना माहीत आहे. शिवसैनिक कधीही पाठीत खंजीर खुपसत नाहीत. बंद दाराआड काय झाले होते आणि तिथून शब्द कसे फिरवले गेले त्या चर्चेत आता आम्ही जात नाही. महाराष्ट्रातले वातावरण आता वेगळे आहे, असेही राऊत यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com