संजय राऊतांची सुरक्षा का वाढवली; शेलारांनी सांगितले 'हे' कारण! 

संजय राऊत यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून राणे यांच्यावर तोफ डांगली होती.
 Sanjay Raut, Ashish Shelar .jpg
Sanjay Raut, Ashish Shelar .jpg

मुंबई : शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना व राणे यांच्यात जोरदार संघर्ष झाला होता. त्यावेळी संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून राणे यांच्यावर तोफ डांगली होती. त्यावरुन भाजप नेते नितेश राणे यांनी राऊत यांना इशारा दिला होता. त्यामुळे राऊत यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, यावरुन भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राऊत यांना टोला लगावला आहे. (Shelar said on Sanjay Raut's security arrangements) 

त्याच बरोबर डीसीपी प्रशांत कदम राऊत यांच्या भेटीला गेले होते. राऊत यांच्याकडे सध्या वाय दर्जाची सुरक्षा आहे. त्यांच्या ताफ्यात सध्या ६ शस्त्रधारी SPU जवानांचा ताफा आहे. आता त्यांच्या ताफ्यात २ अतिरिक्त SPU चे जवान समाविष्ट करण्यात आले आहेत. भाजप नेते नितेश राणे आणि निलेश राणे यांनी राऊत यांना इशारा दिला होता. राऊत जिथे दिसतील तिथे करेक्ट कार्यक्रम करू, असे या दोघांनीही सांगितले होते. त्यानंतरच राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे दिसून येत आहे. राऊत यांच्या सुरक्षेत १२ पोलिसांसहीत साध्या वर्दीतील पोलिसांचा समावेशही करण्यात आला आहे.  

बुधवार (ता २५ ऑगस्ट) सामना तील अग्रलेखात नारायण राणेंचा उल्लेख 'भोकं पडलेला फुगा' असा करण्यात आला होता. यामुळे भाजप चांगलाच आक्रमक झाला होता. इतकेच नव्हे तर सामनाच्या संपादिका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरें यांच्या विरोधात नाशिकमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर प्रतिक्रिया देताना 'मी सामनाचा कार्यकारी संपादक आहे. त्या संपादकीयाची जबाबदारी माझी आहे, असे राऊत यांनी सांगितले होते. 

दरम्यान, संजय राऊत यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे चांगले आहे. ते नेते आहेत, संपादक आहेत. नेहमी पुढे बोलताना दिसतात, त्यामुळे पक्ष कोण चालवतो हेही दिसतेय. बहुतेक त्यामुळेच त्यांना बाहेरून नाही तर अंतर्गत धोका असवा म्हणून त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली असावी, असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com