पूजा चव्हाण मृत्य प्रकरणावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या...

जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या स्वाक्षरी कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सपत्नीक उपस्थित राहिले.
 Sharmila Thackeray jpg
Sharmila Thackeray jpg

मुंबई : जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या स्वाक्षरी कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सपत्नीक उपस्थित राहिले. या कार्यक्रमाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, तरीही मराठी भाषा दिनानिमित्त मनसेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला राज ठाकरेंनी हजेरी लावून, मराठीत सही केली. यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनीही विविध विषयावर भाष्य केले.  

शर्मिला ठाकरे यांना यावेळी राज्यात सुरु असलेल्या टीकटाँक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या, ''हा प्रश्न चुकीच्या माणसाला विचारताय आम्ही सरकारमध्ये नाही पण, महिला म्हणून अशा प्रकरणामध्ये कारवाईची गरज आहे, असे वाटते. तसे पाहिले तर राज्यात अनेक अत्याचाऱ्याच्या घटना घडतात, सगळीकडे कारवाईची गरज आहे. हे प्रकरण लावून धरल्यामुळे मीडियाचे आभार'', असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. 

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, यासाठी मुंबईत आज भाजपच्या महिला नेत्यांकडून ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. महामार्ग अडवून हे आंदोलन सुरू आहे. ठाण्यात भाजप महिला मोर्चाच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन करणाऱ्या महिलांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

टीकटाँक स्टार पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पुण्याच्या लष्कर न्यायालयात गुन्हा दाखल करण्याबाबतचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. 'पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास करावा,' अशी मागणी हा अर्जात करण्यात आली आहे. लीगल जस्टीस सोसायटीतर्फे अॅड भक्ती पांढरे यांनी आज लष्कर न्यायालयात हा अर्ज केला आहे.   

पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी कोणाची तक्रार नाही. त्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकत नाही, अशी भूमिका पुणे पोलिसांनी घेतल्यानंतर या प्रकरणात खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांनी काल थेट वानवडी पोलिसांकडे अर्ज देऊन वनमंत्री संजय राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com