.. हा सोफा ठरलाय महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू!   - Sharad Pawar residence silver oak become center point in state affairs | Politics Marathi News - Sarkarnama

.. हा सोफा ठरलाय महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू!  

अमोल जायभाये
बुधवार, 9 जून 2021

महाराष्ट्राशी संबंधित प्रश्नांवर पवार तोडगा काढणार, यावर अनेकांचा ठाम विश्वास 

मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी मुंबईतील त्यांच्या `सिल्व्हर ओक` या निवासस्थानी राज्याबरोबरच देशभरातील विविध पक्षाचे नेते येत असतात. पवारांच्या पुढाकाराने राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अडचणीच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी `सिल्व्हर ओक`च गाठतात. मधल्या काळात झालेल्या शस्त्रक्रियेमुळे डॅाक्टरांच्या सल्यानुसार पवारही घरात थांबूनच संबंधितांच्या अडचणीवर मार्ग काढतात. घरातील एका सोप्यावर बसून ते येणाऱ्या प्रत्येकाशी संवाद साधत असतात. मुख्यमंत्र्यांपासून ते साध्या कार्यकर्त्यांपर्यंत पवार हे सर्वांशी संवाद साधतात आणि चार हिताचे सल्ले देतात. (Various leaders across the parties meet Sharad Pawar) 

हे ही वाचा : राष्ट्रवादीच्या घड्याळातील काटा हा दहा वाजून दहा मिनिटांवरच का?

या साऱ्या चर्चांमध्ये पवार हे एका सोफ्यावर बसलेले दिसतात. तीच खोली, तोच सोफा आणि तेच शरद पवार असे हे दृश्य असते. समोरची व्यक्ती फक्त बदललेली असते. पवारांची गांभीर्यपूर्वक सर्व ऐकून घेत असल्याची प्रतिमा अनेक फोटोंतून दिसून येते.

शरद पवार यांना दौऱ्याशिवाय चैन पडत नाही. सतत बैठका, सभा, भाषणे याशिवाय त्यांचा दिनक्रम पुरा होत नाही. त्यांची गेल्या 50 वर्षांची ही सवय आहे. कार्यकर्त्यांना भेटणे व त्यांचे सुखदुःख ऐकून घेणे हे तर त्यांच्या आवडीचे काम. मात्र गेले काही दिवस आजारी असल्याने आणि कोरोनाच्या संकटामुळे ते घराबाहेर पडू शकत नाहीत. मात्र घरातील सोफ्यावर बसून भेटायला येणाऱ्या प्रत्येकाचे समाधान आपल्या परीने करणे हे त्यांनी सोडलेले नाही. त्यांची कोणाशी भेट होते, यावरून बातम्या आणि मथळे ठरतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मध्यंतरी भेटले.

हे ही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस हा खरचं मराठ्यांचा पक्ष आहे? 

देवेंद्र फडणवीस त्यांची विचारपूस करून गेले. काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात राजकीय सल्लामसलत करून गेेले. जितेंद्र आव्हाड यांच्या मंत्रालयातर्फे रुग्णांना घरे उपलब्ध करूना देण्याचा कार्यक्रमही पवारांनी येथूनच केला. मराठा, ओबीसी आरक्षण, कोरोनाची आणीबाणी, कृषी कायदे असोत की लक्षद्विपमधील परिस्थिती यावर आढावा, वादळाने झालेले नुकसान असे अनेक विषय पवार हाताळतात. त्यानुसार पत्रव्यवहार, धोरण यावर सातत्याने पवार कार्यरत असतात. 

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनीही  पवार यांची भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा वाढता कामा नये, ही अट शिथिल करण्यासाठी घटनेत दुरुस्ती करण्यासाठी संसदेत सर्वपक्षीयांनी एकत्रि प्रयत्न करण्याची गरज आहे, यावर रामदास आठवले पवार यांच्यात चर्चा झाली. या भेटीतही पवार नेहमीच्या सोफ्यावर आणि आठवले समोर असा फोटो सोशल मिडियात दिसून आला. असा हा सोफा सध्या राजकीय भेटीचा केंद्रबिंदू झालाय. 
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख