शरद पवार म्हणाले, हा तर रडीचा डाव!

भाजपच्या वर्तनावर टीका
sharad pawar
sharad pawar

पुणे : पश्‍चिम बंगालच्या मतदारांनी ममता बॅनर्जी यांना भरभरून पाठिंबा दिला आहे. त्यांनी सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं आहे. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारण्याऐवजी रडीचा डाव खेळला जात असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ममता बॅनर्जी यांनी ऐतिाहिस विजय मिळल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून करण्यात येणाऱ्या राजकारणावर पवार यांनी टीका केली आहे.

देशभर चर्चा असलेल्या पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. ममता बॅनर्जी यांनी मोठा विजय मिळविला असला तरी या निवडणुकीत त्या स्वत: पराभूत झाल्या आहेत. या संपूर्ण निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मोठ्या ताकदीचा वापर केला. पक्षाने आक्रमकपणे ही निवडणूक लढविली. पक्षाच्या बंगाल शाखेला मदत करण्यासाठी देशभरातील कार्यकर्ते, नेते बंगालमध्ये ठाण मांडून बसले होते. या पराभवाचा भाजपला धक्का बसल्याने काही चुकीची वक्तव्ये त्या पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली. त्याबद्दल पवार यांनी हा टोला मारला.

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. मोठ्या संघर्षातून बॅनर्जी यांनी हा विजय मिळविल्याचे खासदार राऊत यांनी म्हटले आहे. आज सकाळी मतमोजणीला सुरवात झाली त्यावेळीदेखील खासदार राऊत यांनी ट्विट करून ममता बॅनर्जी यांना पराभूत करणे इतके सोपे नाही, असे म्हटले होते. त्याचा प्रत्यय दुपारी येताच त्यांनी पुन्हा ट्विटच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, बंगालमधील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचे देशभरातील सर्वच प्रमुख नेत्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील फोनच्या माध्यमातून बॅनर्जी यांचे अभनिंदन करीत त्यांना शभेच्छा दिल्या आहे.बॅनर्जी यांनी मिळविलेले यश ऐतिहासिक मानले जात असल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com